बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा सुपरहिट ठरलेल्या दबंग सीरिजमधील तिसरा चित्रपट 'दबंग ३'मधून अभिनेत्री सई मांजरेकर पदार्पण करते आहे. सई ही दिग्दर्शक व निर्माते महेश मांजरेकर व अभिनेत्री मेधा मांजरेकर यांची मुलगी आहे. सईला आधीपासूनच अभिनेत्री व्हायचे होते. मात्र एक असा वेळ आला होता त्यावेळी तिला वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये कन्फ्यूज होत असल्याचं तिने सांगितले. 


नुकतेच ईटाइम्सशी बोलताना सईनं सांगितलं की, एक वेळ असा आला होता ज्यावेळी मी न्यूरोसाइंटिस्ट पासून सुमो रेसरल पर्यंत सगळं काही मला बनायचे होते. 


सुमो रेसलर बनण्याबाबत तिला विचारलं असता ती म्हणाली की, माझ्या बालपणीचे फोटो तुम्ही पाहिलेत का?


दबंग ३ चित्रपटात काम करण्याची मिळालेल्या संधीबद्दल सई म्हणाली की, ज्यावेळी मला दबंग ३ मिळाला होता. तो दिवस मी नेहमी लक्षात ठेवेन. सलमान सरांसोबत काम करायला मजा आली आणि त्यांनी मला खूप काही शिकवले जे नेहमी माझ्या स्मरणात राहील.


दबंग चित्रपटातील पहिला सीन शूट करतानाच्या अनुभवाबद्दल सईने सांगितले की, तो खूप सोपा सीन होता ज्यात चुलबुल पहिल्यांदाच खुशीला भेटतात. सलमान सरांनी सीनमध्ये मला खूप मदत केली आणि तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही.


सलमान खानच्या दबंग ३ चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभूदेवाने केलं आहे. या चित्रपटात सलमान व सई व्यतिरिक्त सोनाक्षी सिन्हा, अरबाज खान व सुदीप किच्चा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट २० डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

Web Title: Bollywood actress Saiee Manjarekar wants to be sumo wrestler, makes her Bollywood debut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.