अभिनेत्री क्रिती खरबंदा तिचा आगामी चित्रपट 'हाऊसफुल ४'मुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटातील लूक व ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मात्र क्रिती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे तेही वेगळ्या कारणामुळे. तिने मी पागल नाही असं सोशल मीडियावर सांगितलं आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. खरंतर तिचा 'पागलपंती' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक तिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

क्रिती खरबंदा हिने 'पागलपंती' चित्रपटातील तिचे पोस्टर शेअर करत म्हटले की, 'मला माहित आहे हे सगळे पागल आहेत. त्यामुळे मला पागल समजतात. मी पागल नाही आहे. फक्त माझे डोकं नाही चालत.'

'पागलपंती' या चित्रपटातील पोस्टर्स नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटातील आठ मुख्य पात्रांचे फर्स्ट लूक नुकतेच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे.

पागलपंतीमध्ये जॉन अब्राहम, अनिल कपूर, इलियाना डिक्रुझ, कृति खरबंदा, अर्शद वारसी, पुलकित सम्राट, उर्वशी रौतेला व सौरभ शुक्ला मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

या चित्रपटाचे दिग्दर्शन अनीस बझ्मीने केले आहे.हा चित्रपट २२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.


पागलपंतीचा ट्रेलर लवकरच प्रदर्शित करण्यात येणार आहे. बाटला हाऊसनंतर जॉन कॉमेडी अंदाजात पहायला मिळणार आहे. तो या चित्रपटाच्या बाबतीत खूपच उत्सुक आहे.

या चित्रपटाची टॅगलाईन आहे दिमाग मत लगाना क्योंकी इनमें है नहीं... कोई शक नहीं. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bollywood actress kriti Kharband shared poster of Pagalpanti Movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.