करीना कपूरचा निर्धार; दोन्ही मुलांसोबत करणार LGBTQ कम्युनिटीविषयी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 11:10 AM2021-10-13T11:10:39+5:302021-10-13T11:27:27+5:30

Kareena kapoor khan: या दोन्ही मुलांच्या नावावरुन तिला प्रचंड ट्रोलिंग सहन करावं लागलं होतं. मात्र, या सगळ्याकडे कानाडोळा करत करीना तिच्या निर्णयावर ठाम होती.

bollywood actress kareena kapoor khan want to teach taimur and jehangir about lgbtq community | करीना कपूरचा निर्धार; दोन्ही मुलांसोबत करणार LGBTQ कम्युनिटीविषयी चर्चा

करीना कपूरचा निर्धार; दोन्ही मुलांसोबत करणार LGBTQ कम्युनिटीविषयी चर्चा

Next
ठळक मुद्देकरीनाचा 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बॉलिवूडची बेबो अर्थात अभिनेत्री करीना कपूर खान (kareena kapoor khan) कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते. आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी करीना गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाइफमुळे, खासकरुन तिच्या मुलांच्या नावामुळे चर्चेत येत आहे. करीनाने तिच्या दोन्ही मुलांची नावं तैमुर आणि जहांगीर (taimur and jehangir) असं ठेवलं आहे. मात्र, या दोन्ही मुलांच्या नावावरुन तिला प्रचंड ट्रोलिंग सहन करावं लागलं होतं. मात्र, या सगळ्याकडे कानाडोळा करत करीना तिच्या निर्णयावर ठाम होती. सध्या करीना पुन्हा एकदा तिच्या मुलांमुळे चर्चेत आली आहे. परंतु, यावेळी तिने केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अलिकडेच फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत करीनाने आपल्या दोन्ही मुलांना LGBTQ कम्युनिटीविषयी शिकवण देणार असल्याचं म्हटलं आहे. 

सध्या सोशल मीडियावर करीनाची मुलाखत चांगलीच चर्चेत आली आहे. या मुलाखतीत तिने मुलांना LGBTQ कम्युनिटीविषयी माहिती देणार असून त्यांचा आदर करावा अशी शिकवण देणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच मी सगळयांना सारखं मानते त्यामुळे माझ्या मुलांनी प्रत्येकाचा आदर करावा हीच इच्छा असल्याचं तिने स्पष्ट केलं आहे. 

"त्यांना(LGBTQ कम्युनिटी) वेगळं म्हणणं मला अजिबात आवडत नाही. आपण सगळे एकच आहोत. मग, 'ते वेगळे आहेत', असं लोक का म्हणतात? नाही, आपल्या सगळ्यांचं शरीर सारखं आहेत. हृदय, फुफ्फुसं, यकृत सारं काही सारखं आहे. मग तरी सुद्धा आपण त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून का पाहतो? मला हा प्रश्न कायम पडतो, त्यामुळे माझ्या मुलांनी सगळ्यांना समान वागणूक द्यावी हेच मी त्यांना शिकवेन", असं करीना म्हणाली.

पुढे ती म्हणते, "माझं तुमच्या सगळ्यांवर (LGBTQ कम्युनिटी) प्रेम आहे. तुम्ही सगळ्यांना कायमच मला भरभरुन प्रेम दिलं आहे. मी आणि सैफ प्रत्येक गोष्टीकडे पारदर्शक दृष्टीकोनातून पाहतो. LGBTQ कम्युनिटीमधील अनेक जण आमचे मित्र आहेत. आम्ही मोकळ्या मनाने आणि विचारांनी जगणारे आहोत. त्यामुळे माझ्या मुलांनीही तसाच विचार केला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. म्हणूनच, आम्ही दोन्ही मुलांशी LGBTQ कम्युनिटीशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करतो आणि मला वाटतं हीच योग्य पद्धत आहे."

दरम्यान, करीना कपूर कायमच तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असते. जहांगीरच्या जन्मानंतर करीनाचा कलाविश्वातील वावर कमी झाला होता. मात्र, लवकरच तिची मुख्य भूमिका असलेला 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  या चित्रपटात तिच्यासोबत आमिर खान स्क्रीन शेअर करणार आहे. हॉलिवूड चित्रपट 'फॉरेस्ट गंप'चा हा हिंदी रिमेक असून त्याचं दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केलं आहे.
 

Web Title: bollywood actress kareena kapoor khan want to teach taimur and jehangir about lgbtq community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app