बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल नुकताच अक्षय कुमार अभिनीत 'हाऊसफुल ४' चित्रपटात झळकला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर २०० कोटींची कमाई केली. नुकतेच बॉबीचा भाऊ सनी देओलचा मुलगा करण देओलनं पल पल दिल के पास या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल दाखवू शकला नव्हता. मात्र चाहत्यांनी नव्या देओलचं मोठ्या मनानं स्वागत केलं होतं. 


करण देओलनंतर आता सगळ्यांच्या नजरा बॉबी देओलचा मुलगा आर्यमनवर लागून राहिल्या आहेत. तो ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्यासारखा हॅण्डसम आहे. करणनंतर चाहत्यांना आर्यमनच्या डेब्यूबाबत उत्सुकता आहे. त्याच्या पदार्पणाबद्दल बॉबीने खुलासादेखील केला आहे.


हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत बॉबीने सांगितलं की, सध्या आर्यमन शिकतो आहे. तो फक्त १८ वर्षांचा आहे आणि मॅनेजमेंटचा अभ्यास करतो आहे. आर्यमनला शिक्षणात जास्त रस आहे. 


बॉबी पुढे म्हणाला की, आर्यमनला देखील एक दिवस अभिनयात पदार्पण करावेसे वाटेल. तो अभिनेता बनेल की नाही याबद्दल आता ठोस असं काहीच सांगता येणार नाही.
आर्यमन काही दिवसांपूर्वीच मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाला होता.

मागील वर्षी तो बँकॉकमध्ये पार पडलेल्या आयफामध्ये सहभागी झाला होता आणि तिथले त्याचे फोटो व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर आजोबा धर्मेंद्र व वडील बॉबी देओल यांच्यासोबतचा आर्यमनचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

Web Title: Bobby Deol's son's entry into Bollywood after Karan ?, Aryaman is very handsome: Photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.