birthday special :आता अशी दिसते ‘लैला मजनू’ची ही हिरोईन, एका चुकीमुळे संपले करिअर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 08:00 AM2019-09-22T08:00:00+5:302019-09-22T08:00:02+5:30

पडद्यावरचा या अभिनेत्रीचा निष्पाप चेहरा पाहून प्रेक्षक तिच्या प्रेमात पडत. पण आज ती बरीच बदलली आहे. कदाचित त्यांचे चाहतेओळखू शकणार नाहीत इतकी.

birthday special : yesteryear actress ranjeeta kaur then and now | birthday special :आता अशी दिसते ‘लैला मजनू’ची ही हिरोईन, एका चुकीमुळे संपले करिअर

birthday special :आता अशी दिसते ‘लैला मजनू’ची ही हिरोईन, एका चुकीमुळे संपले करिअर

googlenewsNext
ठळक मुद्देरंजीता यांचे राज मसंद यांच्यासोबत लग्न झाले असून त्यांना स्काय नावाचा मुलगा आहे.

80 च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे, अभिनेत्री रंजीता कौर. लैला मजनू, अखियों के झरोखों से, पती पत्नी और वो, तेरी कसम अशा सुमारे 40 सिनेमांत रंजीता यांनी काम केले. आज रंजीता आठवायचे कारण म्हणजे, आज त्यांचा वाढदिवस.  
पडद्यावरचा रंजीता यांचा निष्पाप चेहरा पाहून प्रेक्षक त्यांच्या प्रेमात पडत. पण आज रंजीता ब-याच बदलल्या आहेत. कदाचित त्यांचे चाहते त्यांना ओळखूही शकणार नाहीत इतक्या.

  22 सप्टेंबर 1956 मध्ये जन्मलेल्या रंजीता यांनी ‘लैला मजनू’ या चित्रपटाद्वारे अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. ‘लैला मजनू’नंतर ‘अखियों के झरोखों से’ हा चित्रपट त्यांनी साईन केला. हा चित्रपट सुपरहिट झाला. यानंतर मिथुन चक्रवर्तीसोबतचा ‘तराना’ हा सिनेमाही सुपरडुपर हिट ठरला.

आपल्या फिल्मी करिअरमध्ये रंजीता यांनी राज बब्बर, राज किरण, दीपक पाराशर, विनोद मेहरा,अमोल पालेकर अशा अनेक अभिनेत्यांसोबत चित्रपटात काम केले. मात्र त्यांची आणि मिथुन चक्रवर्ती यांची जोडी सर्वात हिट राहिली. 

‘लैला मजनू’ आणि ‘अखियों के झरोखों से’ असे ब्लॉकबस्ट सिनेमे दिल्यानंतर रंजीता या सगळ्या निर्माता-दिग्दर्शकाची पहिली पसंत होत्या. प्रत्येकजण त्यांना आपल्या चित्रपटात घेऊ इच्छित होता. पण एक वेळ अशी आली की, रंजीता यांच्या फिल्मी करिअरला ओहोटी लागली.

याचे कारण म्हणजे,सलग ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर रंजीता यांनी कुठलाही विचार न करता अनेक सुमार चित्रपट साईन करण्याचा सपाटा लावला. असे म्हणतात की, रंजीता यांनी चित्रपटांत बोल्ड सीन्स देण्यास नकार दिल्यानेही त्या समकालीन अभिनेत्रींच्या तुलनेत मागे पडल्या.

एका वळणावर एकापाठोपाठ एक असे अनेक चित्रपट आपटले आणि रंजीता यांनी बॉलिवूडपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. 90 च्या दशकात त्यांनी इंडस्ट्रीला रामराम ठोकला. अर्थात 15 वर्षांनंतर 2005 मध्ये ‘अंजाने’ या चित्रपटाद्वारे पुन्हा वापसी केली. पण तोपर्यंत त्यांची जादू ओसरली होती.   2012 मध्ये ‘जिंदगी तेरा नाम’ या चित्रपटात त्या अखेरच्या झळकल्या होत्या. यात त्यांनी मिसेस सिंह ही भूमिका साकारली होती. यानंतर रंजीता यांनी बॉलिवूडपासून लांब राहणे पसंत केले.


रंजीता यांचे राज मसंद यांच्यासोबत लग्न झाले असून त्यांना स्काय नावाचा मुलगा आहे. रंजीता यांच्या विरोधात काही दिवसांपूर्वी त्यांचे पती राज मसंद यांनी तक्रार नोंदवली होती. रंजीता यांनी मारहाण केल्याचे त्यांच्या पतीने म्हटले होते. 

Web Title: birthday special : yesteryear actress ranjeeta kaur then and now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.