Birthday Special : When Sunny Deol spoke to Hema Malini for the first time for Dimple Kapadia | 'या' अभिनेत्रीमुळे पहिल्यांदा सनी सावत्र आई हेमा मालिनी यांच्यासोबत बोलला होता, 'हे' होतं कारण!

'या' अभिनेत्रीमुळे पहिल्यांदा सनी सावत्र आई हेमा मालिनी यांच्यासोबत बोलला होता, 'हे' होतं कारण!

सनी देओल ६४ वर्षांचा झाला. १९ ऑक्टोबर १९५६ ला साहनेवालमध्ये पंजाबमध्ये जन्मलेल्या सनीने 'बेताब' सिनेतातून बॉलिवूड डेब्यू केलं होतं. पडद्यावर रागात दिसणारा सनी देओल रिअल लाइफमध्ये फारच शांत आणि सौम्य स्वभावाचा आहे. असं असलं तरी असं म्हटलं जातं की, सनीचं सावत्र आई हेमा मालिनीसोबतचं नातं चांगलं नव्हतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा धर्मेंद्रने हेमा मालिनीसोबत लग्न केलं तेव्हापासूनच सनी आणि हेमा यांच्यातील बोलणं बंद झालं होतं. पण एका व्यक्तीमुळे सनी हेमा मालिनी यांच्यासोबत बोलला होता. 

हेमा मालिनी यांची ऑटोबायोग्राफी 'बियॉंड द ड्रीमगर्ल' मध्ये हेमा मालिनी यांनी त्यांच्या जीवनाशी संबंधित अनेक किस्से यात लिहिले आहेत. यातील एका किस्स्यानुसार, एका अभिनेत्रीमुळे हेमा आणि सनी देओल पहिल्यांदा एकमेकांसोबत बोलले होते. ती अभिनेत्री दुसरी-तिसरी कुणी नसून डिंपल कपाडिया होती. (सनी देओल 'डर' सिनेमानंतर तब्बल 16 वर्षे शाहरुख खानशी बोलला नव्हता, कारण वाचून व्हाल हैराण)

हेमा यांनी त्यांच्या पुस्तकात सांगितले की,  कोणत्या स्थितीत त्यांचं आणि सनी देओलचं बोलणं झालं होतं. 'दिल आशना है' या सिनेमाच्या शूटींग वेळची ही गोष्ट आहे. हेमा या सिनेमाच्या निर्मात्याही होत्या आणि दिग्दर्शिकाही होत्या. डिंपलने या सिनेमात दिव्या भारतीच्या आईची भूमिका साकारली होती. (डिंपल कपाड़ियावरून सनी देओलला पत्नीने दिली होती 'ही' धमकी, दोघांचा व्हिडीओ झाला होता व्हायरल...)

हेमा यांना डिंपल आणि मिथुन यांचा एक पॅराग्लायडिंग सीन शूट करायचा होता. हा सीन प्लेनमधून शूट होणार  होता. पण शूटींगच्या पहिल्या दिवशीच पायलटचा अपघात झाला होता. या घटनेनंतर डिंपल कपाडिया फारच घाबरली होती. डिंपलने या घटनेबाबत सनीला सांगितलं होतं आणि तो लगेच सेटवर आला. (-म्हणून सनी देओलने जगापासून लपवली होती लग्नाची गोष्ट; अमृताला सुद्धा ठेवले होते अंधारात)

पुस्तकात हेमा यांनी लिहिलं की, यानंतर सनी सेटवर येऊन मला भेटला. मी सनीला विश्वास दिला की, डिंपलला काहीच होणार नाही. ही पहिलीच वेळ होती आम्ही एकमेकांशी बोललो. दरम्यान, त्यावेळी डिंपल आणि सनीच्या जवळीकतेची चर्चा होती. असे सांगितले जाते की, त्यांचं ११ वर्षे अफेअर होतं. 

हेमा मालिनी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांच्यात आणि सनीत नेहमीच चांगलं नातं होतं. वेगवेगळ्या चर्चा खोट्या असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यासोबतच हेमा यांनी सांगितले की, जेव्हा त्यांचा अपघात झाला होता तेव्हा सनी हा त्यांना घरी येऊन भेटणारा पहिला व्यक्ती होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Birthday Special : When Sunny Deol spoke to Hema Malini for the first time for Dimple Kapadia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.