ठळक मुद्दे‘सूमन’ या सिनेमात जया बच्चन यांचा अभिनय पाहून शबाना इतक्या प्रभावित झाल्या की, त्यांनी अ‍ॅक्टिंग अँड टेलिव्हिजिन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियात प्रवेश घेतला.

बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्रींपैकी एक म्हणजे शबाना आझमी. हिंदी सिनेसृष्टीतील आपल्या चार दशकांच्या करिअरमध्ये शबाना यांनी एकापेक्षा एक अजरामर सिनेमे दिलेत. आज शबाना यांचा वाढदिवस.

प्रसिद्ध शायर आणि गीतकार कैफी आझमी यांच्या घरी 18 सप्टेंबर 1950 रोजी  शबाना आझमी यांचा जन्म झाला.  

‘सूमन’ या सिनेमात जया बच्चन यांचा अभिनय पाहून शबाना इतक्या प्रभावित झाल्या की, त्यांनी अ‍ॅक्टिंग अँड टेलिव्हिजिन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियात प्रवेश घेतला. 1973मध्ये अ‍ॅक्टिंगचा डिप्लोमा प्राप्त केल्यानंतर दिवंगत अहमद अब्बास यांनी त्यांना ‘फासला’ या सिनेमासाठी साइन केले. मात्र शबाना यांचा डेब्यू झाला तो ‘अंकूर’ या चित्रपटातून.

विशेष म्हणजे या पहिल्याच चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी शबाना यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

9 डिसेंबर 1984 मध्ये शबाना यांनी सुप्रसिद्ध गीतकार व लेखक जावेद अख्तर यांच्यासोबत लग्न केले. पण त्याआधी शबाना यांच्या आयुष्यात एक दुसरी व्यक्ती होती. होय, त्या अभिनेते व दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या प्रेमात होत्या.

‘इश्क इश्क इश्क’ या चित्रपटाच्या सेटवर शबाना व शेखर यांची पहिली भेट झाली होती. या पहिल्याच भेटीत दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. पुढे ही मैत्री प्रेमात बदलली.
त्याकाळात शबाना एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देत होत्या. याऊलट शेखर कपूर अभिनेता म्हणून फ्लॉप ठरले होते. एकापाठोपाठ एक फ्लॉप चित्रपट देऊनही शबानांसोबत असलेल्या अफेअरमुळे शेखर कपूर चर्चेत होते. दोघांच्या अफेअरच्या चर्चा कधी नव्हे इतक्या मीडियात चर्चेत होत्या.

शेखर व शबाना यांचे नाते सात वर्षे चालले. पण एका वळणावर दोघांनीही संगनमताने हे नाते संपवण्याचा निर्णय घेतला. पुढे शबाना यांनी जावेद अख्तरसोबत लग्न केले.
शेखर कपूर व शबाना आजही चांगले मित्र आहेत. ब्रेकअपनंतर देखील शेखर कपूर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मासूम’ या चित्रपटात शबाना यांनी मुख्य भूमिका साकारली होती. 

‘मासूम’ या चित्रपटाच्यावेळी मेघा गुजराल या शेखर कपूर यांना असिस्ट करत होत्या. या चित्रपटानंतर काहीच वर्षांत शेखर कपूर यांनी मेघा यांच्यासोबत लग्न केले. पण लग्नानंतर काहीच वर्षांत शेखर आणि सुचित्रा कृष्णमुर्ती या अभिनेत्रीच्या अफेअरची चर्चा सुरू झाल्यामुळे मेघा यांनी शेखर यांच्यासोबत घटस्फोट घेतला. त्यानंतर शेखर यांनी सुचित्रासोबत लग्न केले तर मेघा प्रसिद्ध गायक अनुप जलोटा यांच्यासोबत विवाहबंधनात अडकल्या. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Birthday Special : shabana azmi was relationship WITH director shekhar kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.