ठळक मुद्दे अखेर नयनतारासाठी प्रभूदेवाने एक मोठा निर्णय घेतला. पत्नीसोबतचे १६ वर्षांचे नाते तोडत २०११ मध्ये त्याने पत्नीला घटस्फोट दिला.

दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा हिने साऊथ सिनेमात एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. 2003 मध्ये मल्याळम चित्रपटापासून फिल्मी करिअरची सुरुवात करणा-या नयनताराचे खरे नाव डायना मरियम कुरियन आहे. आज नयनताराचा वाढदिवस.

नयनताराने एकापेक्षा एक हिट चित्रपट दिलेत. पण प्रेमाच्या बाबतीत मात्र ती अपयशी ठरली. होय, एकेकाळी नयनतारा व प्रभूदेवा या दोघांच्या प्रेमाच्या बातम्या चर्चेत होत्या. ही लव्हस्टोरी कधी नव्हे इतकी गाजली होती. पण सरताशेवटी ती अधुरी राहिली.

नयनतारा व प्रभूदेवा एकमेकांच्या प्रेमात पडले तेव्हा प्रभूदेवा विवाहित होता. तीन मुलांचा बाप होता. पण प्रेम आंधळे असते, त्यानुसार पत्नी व मुलांना सोडून प्रभूदेवा नयनतारासोबत लिव्ह-इनमध्ये राहू लागला. प्रभूदेवाची पत्नी लताला ही गोष्ट कळली आणि तिने थेट फॅमिली कोर्टात धाव घेतली. नयनताराने माझ्या पतीशी लग्न केले तर मी उपोषणावर बसेल, अशी धमकीही लताने दिली. या प्रकरणाचा इतका बोभाटा झाला की, रस्त्यावर नयनताराचे पुतळे जाळले गेलेत. यातून सहीसलामत सुटण्यासाठी  आमच्यात असे काहीही नाही, असे  नयनताराने  अगदी शिरजोरपणे सांगितले होते. पण प्रभूदेवापासून दूर राहणे नयनताराला शक्य नव्हते.  प्रभूदेवासोबत लग्न करण्यासाठी तिने ख्रिश्चन धर्म सोडून हिंदू धर्मही स्विकारला होता. 

 अखेर नयनतारासाठी प्रभूदेवाने एक मोठा निर्णय घेतला. पत्नीसोबतचे १६ वर्षांचे नाते तोडत २०११ मध्ये त्याने पत्नीला घटस्फोट दिला. यापोटी प्रभूदेवाला   १० लाख रूपये, शिवाय २० ते २५ कोटींची प्रॉपर्टी शिवाय दोन कार असे सगळे पत्नीला द्यावे लागले. यामुळे नयनताराचे प्रेम आपल्याला मिळेल, असा त्याचा अंदाज होता. पण त्याचा हा अंदाज फसला. जिच्याशी लग्न करण्यासाठी प्रभुदेवाने पत्नीला सोडले त्या नयनताराने २०१२ मध्ये प्रभूदेवासोबतचे नाते संपल्याचे जाहीर केले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: BIRTHDAY SPECIAL : nayanthara and prabhu deva love affair story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.