birthday special kangana ranauts sister rangoli shocking evelation about mahesh bhatt-ram | अन् महेश भट यांनी कंगना राणौतला चप्पल फेकून मारली...!!!

अन् महेश भट यांनी कंगना राणौतला चप्पल फेकून मारली...!!!

कंगना राणौत एक गुणी अभिनेत्री आहे. कंगनाने स्वबळावर बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वत:चे एक आगळे-वेगळे स्थान निर्माण केले. अर्थात सोबत वादही ओढवून घेतले. आजही काही वाद तिचा पिच्छा पुरवताना दिसतात. मध्यंतरी कंगनाला बॉलिवूडमध्ये ब्रेक देण्यावरून ट्वीटरवर एका वादाला तोंड फुटले होते.  कंगना राणौत विरूद्ध आलिया भट या दोघी यावरून दोघी आपआपसात भिडल्या होत्या. या वादात आलियाची आई सोनी राजदान मैदानात उतरली होती. याच वादाच्या पार्श्वभूमीवर कंगनाची बहीण रंगोली चंदेल हिने ट्वीटरवर आलियाचे डॅड महेश भट यांच्याबद्दल एक खळबळजनक खुलासा केला होता.

 होय, आधी कंगनाने आलियाला लक्ष्य केले होते. यानंतर आलियाची आई सोनी राजदान यांनी एक ट्वीट करून कंगनाला फैलावर घेतले होते. ‘ महेश भट यांनी कंगनाला ब्रेक दिला. पण हीच कंगना सतत महेश भट यांच्या पत्नी व मुलीवर टीका करतेय. आता मी काय बोलू? यामागचा अजेंडा काय? ’,असे   सोनी राजदान  म्हणाल्या होत्या. सोनी राजदान यांचे ट्वीट पाहून  कंगनाची बहीण रंगोली जाम बिथरली होती आणि महेश भट यांच्याबद्दल तिने एक खळबळजनक खुलासा केला होता.

‘ प्रिय सोनीजी, महेश भट यांनी कंगनाला ब्रेक दिलेला नाही तर अनुराग बासूने दिला. महेश भट यांनी त्या चित्रपटात क्रिएटीव्ह डायरेक्टर म्हणून काम केले होते. ‘धोखा’  चित्रपटात काम करण्यास कंगनाने नकार दिल्यामुळे महेश भट संतापले होते. त्यांनी कंगनाला नाही नाही ते सुनावले होते. ‘ वो लम्हे’च्या प्रिव्यूदरम्यान महेश भट यांनी १९ वर्षांच्या कंगनाला चप्पल फेकून मारली होती. त्यांनी कंगनालाच तिचा चित्रपट पाहू दिला नव्हता. यानंतर माझी बहीण रात्रभर रडली होती,’ असे रंगोलीने ट्वीटमध्ये लिहिले होते.
महेश भट यांनी कंगनाला चप्पल फेकून मारली होती, या रंगोलीच्या खुलाशाने  खळबळ माजली होती.  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: birthday special kangana ranauts sister rangoli shocking evelation about mahesh bhatt-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.