ठळक मुद्देदोन अफेअरनंतर 2000 मध्ये नीलमने यूकेचा बिझनेसमन ऋषी सेठियासोबत लग्न  केले. पण काहीच वर्षांत दोघांचा घटस्फोट झाला.

अभिनेत्री नीलम कोठारीने अनेक वर्षांपूर्वी सिनेसृष्टीला रामराम ठोकला आणि हि-यांच्या बिझनेसमध्ये रमली. मुंबईत नीलमचे हि-यांच्या दागिन्यांचे मोठे दुकान आहे. 1984 मध्ये ‘जवानी’ या सिनेमाद्वारे नीलमने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि पुढे एकापेक्षा एक हिट चित्रपट आपल्या नावी केलेत. 2001 मध्ये प्रदर्शित ‘कसम’ या चित्रपटात नीलम शेवटची दिसली होती. हे सगळे सांगायचे कारण म्हणजे, आज नीलमचा वाढदिवस.

नीलमने अनेक हिट चित्रपट दिलेत हे खरे. पण तिच्या चित्रपटांपेक्षा तिची पर्सनल लाईफ अधिक चर्चेत राहिली. गोविंदा आणि बॉबी देओलसोबत तिचे नाव जोडले गेले. पण तिने तिस-याच व्यक्तिसोबत लग्न केले. हे लग्नही फार काळ टिकले नाही. यानंतर नीलमने समीर सोनीसोबत लग्नगाठ बांधली.


80 आणि 90च्या दशकात प्रसिद्ध अभिनेत्री नीलम आणि गोविंदाचे अफेअर प्रचंड गाजले होते. पडद्यावरही गोविंदा -नीलमची जोडी प्रचंड गाजली होती. या जोडीने डझनावर सिनेमे केलेत. ‘इल्जाम’ हा दोघांचाही पहिला चित्रपट होता. याच चित्रपटाच्या सेटवर गोविंदा व नीलम एकमेकांच्या प्रेमात पडले होते.   गोविंदा नीलमवर इतके प्रेम करायचा, की तिला कुण्या दुस-या हिरोसोबतही पाहू शकत नव्हता. तिच्यासोबत लग्न करण्याची गोविंदाची इच्छा होती. पण गोविंदाच्या आईला हे नाते मान्य नव्हते. तिने गोविंदासाठी दिग्दर्शक अनिल सिंग यांची मेहुणी सुनीता हिला पसंत केले होते. आईपुढे गोविंदाचे काहीही चालले नाही. अखेर आईच्या इच्छेखातर  गोविंदाने सुनीतासोबत लग्न केले. 

अभिनेता बॉबी देओलसोबतही नीलमचे अफेअर होते. एक-दोन वर्षे नाही तर तब्बल पाच वर्षे हे अफेअर चालले. खुद्द नीलमने फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला होता. ‘ मला पर्सलन लाईफबद्दल बोलायला आवडत नाही पण माझ्या व बॉबीच्या  नात्याबद्दल अनेक अफवा पसरवण्यात आल्या. पूजा भट्टमुळे  बॉबी आणि माझे ब्रेकअप झाले, असेही म्हटले गेले. पण असे काहीही नाही. कुठल्याही तिस-या व्यक्तिमुळे आमचे ब्रेकअप झाले नाही. आम्ही परस्पर संमतीने एकमेकांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला,’ असे ती म्हणाली होती.
  नीलम आणि बॉबी या नात्याबद्दल गंभीर होते पण त्यांचे नाते लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही. असे म्हणतात की, धर्मेंद्र यांचा या नात्याला विरोध होता.   बॉबीने कुठल्याही अभिनेत्रीसोबत लग्न करु नये, अशी त्यांची इच्छा होती.   

दोन अफेअरनंतर 2000 मध्ये नीलमने यूकेचा बिझनेसमन ऋषी सेठियासोबत लग्न  केले. पण काहीच वर्षांत दोघांचा घटस्फोट झाला. 2007 मध्ये टीव्ही अभिनेता समीर सोनी नीलमच्या आयुष्यात आला आणि 2011 मध्ये दोघांनी लग्न केले.  दोघांनी एक मुलगी दत्तक घेतली आहे जिचे नाव अहाना आहे. समीर व नीलम दोघांचेही हे दुसरे लग्न आहे.

Web Title: birthday special : bollywood actress neelam kothari soni life facts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.