अन् तिच्या आयुष्यात सनीची एन्ट्री झाली...! वाचा, डिम्पल व सनी देओलची ‘अधुरी प्रेम कहाणी’

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 08:00 AM2021-06-08T08:00:00+5:302021-06-08T08:00:07+5:30

90 च्या दशकात डिम्पल व सनीची लव्हस्टोरी कधी नव्हे इतकी चर्चेत होती. सनी व डिम्पल या दोघांनी गुपचूप लग्न केल्याचीही चर्चा होती...

birthday special Actress Dimple Kapadia And Sunny Deol Love Story | अन् तिच्या आयुष्यात सनीची एन्ट्री झाली...! वाचा, डिम्पल व सनी देओलची ‘अधुरी प्रेम कहाणी’

अन् तिच्या आयुष्यात सनीची एन्ट्री झाली...! वाचा, डिम्पल व सनी देओलची ‘अधुरी प्रेम कहाणी’

Next
ठळक मुद्देसनी व डिम्पल यांचे प्रेम 11वर्षे चालले. या काळात दोघेही अतिशय जवळ आले होते. पण रवीना टंडनची एन्ट्री झाली आणि या प्रेमकथेला ब्रेक लागला.

बॉलिवूड अभिनेत्री डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) हिचा आज (8 जून) वाढदिवस. वयाच्या उण्यापु-या 16 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या या अभिनेत्रीने आपले सौंदर्य आणि प्रतिभेच्या जोरावर स्टारडम मिळवले. सुपरस्टार राजेश खन्ना हेही तिच्या याच स्टारडमवर  भाळले होते. राज कपूर यांनी आपल्या मुलाला म्हणजेच ऋषी कपूरला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्यासाठी  ‘बॉबी’ या चित्रपटाची निवड केली आणि या चित्रपटात हिरोईन म्हणून डिंपल यांची वर्णी लागली.  ‘बॉबी’प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने कमाईचे सगळे रेकॉर्ड तोडले. डिंपल नावाची ही नवी हिरोईन कोण, कुठली हे कळायच्या आधीच चाहते तिच्यासाठी अक्षरश: वेडे झालेत. ही नवी हिरोईन एका रात्रीत स्टार झाली.  पण  ‘बॉबी’ रिलीज होण्याआधी डिंपल यांनी  लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि  डिंपल राजेश खन्ना यांच्यासोबत विवाहबद्ध झाली. ( Dimple Kapadia  Birthday)

त्यावेळी डिंपल केवळ 16 वर्षांची होती तर राजेश खन्ना तिच्यापेक्षा दुप्पट वयाचे म्हणजे 32 वर्षांचे होते. पहिला सिनेमा सुपरडुपर हिट झाला होता. डिंपल स्टार झाली होती. पण हे स्टारडम मिरवण्याऐवजी लग्नानंतर तिच्या वाट्याला फक्त एका सुपरस्टारची बायको म्हणून मिरवणे आले. लग्नानंतर 11 वर्षे डिंपलने एकही सिनेमा केला नाही. खरे तर तिला काम करायचे होते. पण राजेश खन्ना यासाठी राजी नव्हते. कधीतरी डिंपलच्या मनातील ही धुसफूस बाहेर यायची. पुढे पुढे वैवाहिक आयुष्यात खटके उडू लागले आणि 11 वर्षांनंतर डिंपलने निर्णय घेतलाच. होय, मुलींना घेऊन ती राजेश खन्ना यांच्यापासून वेगळी राहू लागली.

यानंतर काय तर डिंपलच्या आयुष्यात सनी देओलची (Sunny Deol) एन्ट्री झाली. 90 च्या दशकात डिम्पल व सनीची लव्हस्टोरी कधी नव्हे इतकी चर्चेत होती. लोकांनी यांना पती-पत्नी म्हणून बोलवणेही सुरु केले होते. केवळ इतकेच नाही तर डिम्पलच्या दोन्ही मुली ट्विंकल व रिंकी या दोघींनीही सनीला पापा म्हणून बोलवणे सुरु केले होते.
 
अर्थात  सनी विवाहित होता.  1982मध्ये राजेश खन्नांपासून विभक्त झाल्यावर डिम्पल व सनी दोघेही लिव्ह इन मध्ये राहू लागला होता. सनीची पत्नी पूजा ही सुद्धा मुंबईत होती. पण तरिही तो डिम्पलसोबत राहत होता. यादरम्यान सनी व डिम्पल या दोघांनी गुपचूप लग्न केल्याचीही चर्चा होती.

सनी व डिम्पल या दोघांनी आपले लव्ह लाईफ बरीच वर्षे लपवून ठेवले. डिम्पल व सनी दोघांपैकी कुणीही त्यांचे नाते जगजाहिर करायला तयार नव्हते. खरे तर सनीची एक्स गर्लफ्रेन्ड अमृता सिंह हिनेच या नात्याला तोंड फोडले. सनी व डिम्पल यांच्या रिलेशनबद्दल विचारले गेल्यावर अमृता तिच्या मनातील कटुता लपवू शकली नव्हती. डिम्पलजवळ केक आहे आणि ती तो खात आहे. तिच्याकडे गमावण्यासारखे काहीही उरलेले नाही, तिला जे हवे होते, ते तिला मिळालेय, असे अमृता एका मुलाखतीत म्हणाली होती.

सनी व डिम्पल यांचे प्रेम 11वर्षे चालले. या काळात दोघेही अतिशय जवळ आले होते. पण रवीना टंडनची एन्ट्री झाली आणि या प्रेमकथेला ब्रेक लागला. अक्षय कुमारसोबतच्या ब्रेकअपमुळे रवीना निराश होता. या काळात तिला सनीचा आधार मिळाला आणि यानंतर सनी व डिम्पल हळूहळू दूर होत गेले. काहींच्या मते, कौटुंबिक दबावामुळे सनीला डिम्पलसोबतचे नाते तोडावे लागले. पण कदाचित सनीच्या हृदय कायम डिम्पल होती. समाजासाठी त्यांनी प्रेमाचा त्याग केला. अर्थात खरे काय झाले हे डिम्पल व सनीशिवाय कुणीच जाणत नाही.

 

Web Title: birthday special Actress Dimple Kapadia And Sunny Deol Love Story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app