तुझा सिनेमा कोण बघणार? केआरकेच्या प्रश्नाने हिना खानची सटकली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 01:52 PM2020-02-03T13:52:50+5:302020-02-03T13:56:25+5:30

हिना खानने घेतला केआरकेचा क्लास

bigg boss ex-contestant kamal r khan made fun of hina khan actress gives an epic reply | तुझा सिनेमा कोण बघणार? केआरकेच्या प्रश्नाने हिना खानची सटकली

तुझा सिनेमा कोण बघणार? केआरकेच्या प्रश्नाने हिना खानची सटकली

googlenewsNext
ठळक मुद्दे‘हॅक्ड’ चित्रपटात सॅमची कथा रेखाटण्यात आली आहे.

बिग बॉसची स्पर्धक राहिलेल्या हिना खानचे करिअर सध्या यशाच्या शिखरावर आहे. हिनाचा ‘हॅक्ड’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतीच हिना ‘बिग बॉस 13’मध्ये या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचली. तिचे हे प्रमोशन एका व्यक्तीला चांगलेच खटकले. ती व्यक्ती कोण तर कायम वादग्रस्त ट्वीट करून चर्चेत राहणारा केआरके अर्थात कमाल आर खान.  ट्वीटरवर तो हिनाची टर उडवताना दिसला.
हिना खानसोबत चित्रपट बनला, हे ऐकून मला प्रचंड आश्चर्य वाटले. हिनाचा सिनेमा कोण बघणार? मला 100 टक्के खात्री आहे की, हिना एकटीच तिचा सिनेमा बघणार,’असे डिवचणारे ट्वीट केआरकेने केले. 


केआरकेचे हे ट्वीट वाचून गप्प बसणार ती हिना कुठली? तिनेही त्याच्या या ट्वीटला खरमरीत उत्तर दिले. ‘कुठलेही कारण नसताना एकमेकांना कमी लेखणे योग्य नाही. मी तुझ्यासाठी कुठलेही महत्त्व ठेवत नाही. पण आज इथपर्यंत पोहोचण्यासाठी मी खूप कष्ट घेतले आहेत,’असे हिनाने लिहिले.


हिनाच्या या ट्वीटनंतर अभिनेता करणवीर बोहरा हाही तिच्या बाजूने मैदानात उतरला. त्यानेही केआरकेचा चांगलाच क्लास घेतला. ‘केआरके भाई, तुझ्याबद्दल लोक काहीही बोलोत, पण तुझे हजारो फॉलोअर्स आहेत, हे खरे आहे. आम्हाला कुठलाही गॉडफादर नाही. पण उराशी असंख्य स्वप्न आहेत. हिना खान तिच्या हिंमतीवर इथपर्यंत पोहोचली आहे,’ अशा शब्दांत त्याने केआरकेला सुनावले.

‘हॅक्ड’ चित्रपटात सॅमची कथा रेखाटण्यात आली आहे. एक 19 वर्षांचा मुलगा हिनाच्या प्रेमात पडतो. ती त्याचे प्रेम नाकारते आणि हा मुलगा सूडाच्या भावनेने पेटून उठतो. तिचे सोशल अकाऊंट हॅक करून तो कसा सूड घेतो, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. 

Read in English

Web Title: bigg boss ex-contestant kamal r khan made fun of hina khan actress gives an epic reply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.