बॉलिवूडमध्ये आलेल्या मीटू वादळामुळे तनुश्री दत्तासोबत आतापर्यंत कित्येक अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत घडलेल्या वाईट प्रकार व लैंगिक शोषणाबाबतचा खळबळजनक खुलासा केला आहे. मागील काही दिवसांपूर्वी झरीन खान व सुरवीन चावलाने कास्टिंग काऊचबाबतचा खुलासा केला होता. त्यानंतर आता बिग बॉसची एक्स कंटेस्टंट एली अबरामचं नावही समोर आलं आहे. एलीनं तिच्या सुरूवातीच्या काळात तिला आलेल्या वाईट अनुभवाचा खुलासा केला आहे.

पिंकव्हिलाला दिलेल्या एका मुलाखतीत एलीनं सांगितलं की, तिच्या स्ट्रगलिंग काळात जेव्हा ती दिग्दर्शकांना भेटायला जायची, त्यावेेळी वाईट पद्धतीने हात मिळवला जात होता. जेव्हा तिने तिच्या फ्रेंड्सना सांगितलं त्यावेळी त्यांचा तसा हात मिळवण्यामागचा उद्देश समजला आणि ती खूप हैराण झाली होती.


एली पुढे म्हणाली की, मी दोन दिग्दर्शकांना भेटली, त्यांनी हात मिळवताना माझ्या हातावर बोटांनी स्क्रॅच केलं. मी माझ्या फ्रेंड्सना याचं कारण विचारलं ते ऐकून मी खूप हैराण झाली. त्यानंतर त्यांनी मला त्याचा अर्थ सांगितला. ते म्हणाले की याचा अर्थ दिग्दर्शकाला माझ्यासोबत झोपायचे होते.


एलीने सांगितले की, मला वजन घटवायला सांगितलं. कुणी म्हणालं की माझी उंची कमी आहे तर कुणी माझ्या दातांबद्दल बोललं. एका मुलीनं मला मी अभिनेत्री बनू शकत नाही कारण माझी उंची कमी असल्याचं सांगितलं.

या सगळ्याकडे मी दुर्लक्ष केलं. भारतात दोन महिने राहिल्यानंतर मला वाटलं की कदाचित मला जमणार नाही. 

Web Title: Bigg Boss Ex Contestant Elli Avram Shares Her Experience Casting Couch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.