अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. गेल्या आठवड्यात तिची मुख्य भूमिका असलेला चित्रपट 'बाला' प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात तिने साकारलेल्या लतिकाने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. नुकतेच तिने एका मुलाखतीत सांगितलं की, 'बालपणी तिला कोणत्या ना कोणत्या कारणावरून अपमान केला जायचा.'

भूमीने सांगितले की,'प्रत्येकाला चिडवले जाते. बालपणी मला जाडेपणावरून चिडवले जात होते. मी आधीपासून चबी होते. प्रत्येक गोष्टींपासून प्रॉब्लेम होता. जर तुम्ही छोटे असाल तर प्रॉब्लेम, जर जास्त उंच असाल तरी प्रॉब्लेम. केस जास्त आहेत की नाहीत, गोरे आहात की काळे प्रत्येक गोष्टीत समस्या असते.'


भूमी पेडणेकर हिने दम लगा के हईशा, शुभ मंगल सावधान, टॉयलेट एक प्रेमकथा, सोन चिडिया यासारख्या सिनेमात काम करून रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. त्यानंतर आता तिचे आगामी चित्रपट सांड का आँख व पति पत्नी और वो सारख्या चित्रपटांची चाहते वाट पाहत आहेत.

दम लगा के हईशा चित्रपटातून भूमीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटातील भूमिकेतून तिला लोकप्रियता मिळाली.

अभिनेत्री बनण्यापूर्वी भूमी यशराज फिल्म्समध्ये कास्टिंग डिरेक्टर शानूची असिस्टंट होती.

 

 

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bhumi Pednekar shares her childhood bullying and fat shaming experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.