काही दिवसांपूर्वी बॉलिवूडची पिग्गी चॉप्स म्हणजेच अभिनेत्री प्रियंका चोप्राला डीपनेक गाऊनमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता तसाच डीपनेक गाऊन भूमी पेडणेकर हिनेदेखील परिधान केला होता. त्यामुळे ती देखील चर्चेत आली आहे. या गाऊनमध्ये क्लीवेज दिसत आहे. या गाऊनमधील फोटो भूमीने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

भूमीने नुकतीच ‘नेक्स ब्रँड व्हिजन समिट अ‍ॅण्ड अवॉर्ड २०२०’ मध्ये ती या हॉट अवतारात रेड कार्पेटवरून एंट्री केली. तिने या ड्रेसिंगसाठी देसी गर्ल प्रियांका चोप्राकडून प्रेरणा घेतली होती. भूमीचा हा गाऊन पीच कलरचा होता पण पॅटर्न पूर्णपणे पीसीच्या ड्रेसप्रमाणेच होता. ती या ड्रेसिंगमध्ये खुपच कॉन्फिडंट वाटत होती. 

बॉलिवूडमध्ये भूमीने २०१४ साली दम लगा के हईशा चित्रपटातून पदार्पण केले आहे. तिने ज्यावेळी बॉलिवूडमध्ये डेब्यू केला तेव्हा तिचे वजन ९० किलो होते. मात्र आता ती फिट झाली असून दिवसेंदिवस ग्लॅमरस दिसते आहे.


याबाबत भूमी म्हणाली की, मी साईज किंवा रंगामुळे कधीच स्वतःला कमी लेखलं नाही. मी स्वतःला नेहमीच सेक्सी समजलं आहे. ज्यावेळी माझं वजन ९० किलो वजन होते त्यावेळी देखील स्वतःला आकर्षक समजत होते. त्यावेळी देखील मी छोटे कपडे परिधान करत होते आणि क्लीवेज दाखवतानादेखील अनकंम्फर्टेबल समजत नव्हते.


भूमी पेडणेकर मागील वर्षी सोनचिरैया, साँड की आँख, बाला व पती पत्नी ओर वो चित्रपटात झळकली आहे. त्यातील तिच्या भूमिकेचं सर्वत्र खूप कौतूक झाला. आता ती भूत व शुभ मंगल ज्यादा सावधानमध्ये पहायला मिळाली. 

भूमी सध्या ‘दुर्गावती’ चित्रपटाचे चित्रीकरणात बिझी आहे. ती अलीकडेच सायकलिंग करत चित्रपटाच्या सेटवर पोहोचल्याचे समजते. 

Web Title: Bhumi Pednekar shared deep neck gown photo on Instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.