अभिनेत्री भूमी पेडणेकर सध्या तिच्या अफेयरमुळे चर्चेत आली आहे.  भूमी बॉलिवूडच्या एका हिरोच्या प्रेमात पडल्याचे सध्या कानावर येतेय. हा हिरो कोण तर जॅकी भगनानी. फिल्मफेअरने दिलेल्या वृत्तानुसार, भूमी व जॅकी यांच्यात सध्या एक वेगळेच बॉन्डिंग पाहायला मिळेतय. आत्तापर्यंत या दोघांत केवळ मैत्री होती. पण आता ही मैत्री यापलीकडे गेल्याचे कळतंय. इंटेक्स्ट लाइव्हनं दिलेल्या वृत्तानुसार, आता जॅकी तिला प्रोफेशनल सल्लेदेखील देऊ लागलाय.

नुकतंच एका जाहिरातीच्या शूटवेळी इंटेक्स्ट लाइव्हला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भूमीला हॅण्डल करणाऱ्या टीम मेंबर्समध्ये इंटरेस्टिंग चर्चा होत होती. त्यांचं म्हणणं होतं की जॅकीने भूमीला सल्ला दिला आहे की यशराज फिल्म्ससोबत नाते तोडून दे.

आता भूमी तिच्या बॉयफ्रेंडचं ऐकणार की नाही आणि ती प्रोडक्शन हाऊसचे चित्रपट करणार की नाही, हे पाहणं कमालीचं ठरणार आहे. यशराज फिल्म्सनं तिला दम लगा के हईशा सारखा चित्रपट दिला आहे. 


अद्याप भूमी व जॅकीने आपले नाते जगजाहिर केलेले नाही. पण दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचे लपून राहिलेले नाही. तूर्तास दोघांनीही आपल्या लिंकअपच्या चर्चांवर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण येत्या दिवसांत दोघेही यावर काय प्रतिक्रिया देतात, ते पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.


जॅकी हा निर्माता वासू भगनानीचा मुलगा आहे. जॅकी भगनानीने 2009 मध्ये प्रदर्शित ‘कल किसने देखा’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. पण त्याचा हा पहिलाच चित्रपट सुपरडुपर फ्लॉप ठरला. 2011 मध्ये  F.A.L.T.U. या चित्रपटात झळकला. यानंतर ‘अजब गजब लव्ह’, ‘रंगरेज’, ‘मित्रों’ अशा अनेक चित्रपटात तो दिसला. पण त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही. सध्या तो पित्याचा निर्मिती व्यवसाय सांभाळतो.


भूमी सध्या ‘सांड की आंख’ या चित्रपटात बिझी आहे. याशिवाय कार्तिक आर्यन व अनन्या पांडेच्या ‘पती, पत्नी और वो’ या रिमेकमध्येही ती झळकणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bhumi Pednekar rumour boyfriend Jacky Bhagnani gave her suggestion its interesting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.