बॉलिवूड कलाकारांमध्ये बऱ्याचदा वादविवाद व भांडणं झाल्याचे वृत्त ऐकायला मिळतात. असंच काहीसं वृत्त बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू व भूमी पेडणेकर यांच्याबाबतीतील ऐकायला मिळालं होतं. मागील महिन्यात 'सांड की आँख' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तापसी व भूमीमध्ये वाद झाले असल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर त्या दोघींनी सोशल मीडियावर खुलासा केला होता. आता पुन्हा एकदा भूमी पेडणेकर तापसीसोबत झालेल्या भांडणाबाबतचा खुलासा केला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, भूमीने तापसीसोबत झालेलं भांडणाचे वृत्त ही निव्वळ अफवा होती आणि मस्करी केली होती. तिने सांगितले की, मी व तापसी केवळ दिग्दर्शकासोबत मस्करी करत होतो. ही मस्करी एप्रिल फूलच्या वेळी केली होती. मात्र ही गोष्ट लोकांना पचली नाही की आम्ही दोघी खूप चांगल्या मैत्रिणी आहोत. तापसी आणि माझं नातं बहिणीच्याही पुढचं आहे. 


भूमीने पुढे सांगितलं की, आमच्या दोघांची मैत्री लोकांना समजत नाही आहे आणि दोन अभिनेत्री कसे भांडणं करू शकतात. सांड  की आँख चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तापसी पन्नू व भूमी पेडणेकर यांच्यामध्ये गरमागरमी पहायला मिळाली  जेव्हा भूमीने एक सीन रिटेक करायचं सांगितलं होतं. तर तापसीला ते सीन रिशूट करायचं नव्हतं. कारण तिला वाटलं की तो सीन व्यवस्थित शूट झालं आहे. रिशूटने सुरू झालेल्या गोष्टींचे पाहता पाहता भांडणात रुपांतर झालं आणि शूटिंग थांबवावं लागलं. त्यांचे हे वाद असे सादर केले गेले की त्या दोघींना सोशल मीडियावर खुलासा करावा लागला.


तापसी पन्नूने याबद्दल ट्विट केलं. तिने म्हटलं की, छोट्या मुद्द्यावरून वाद होऊ शकतात कारण बिझी शेड्युल व कठीण शूटिंगमुळे माणूस असल्यामुळे असं होणं स्वाभाविक आहे. हा मुद्दा आणखीन वाढवण्याची गरज नाही. 


तर भूमी पेडणेकरने तापसीच्या ट्विटवर रिएक्शन देत लिहिलं की, माझा पण या गोष्टीवर विश्वास आहे आणि सकारात्मक गोष्टी पाहणं पसंत करते. आम्ही या चित्रपटासाठी खूप परिश्रम घेतले आहेत. कृपया अशा अफवा क्रिएट करून आमचे नाते खराब करू नका.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bhumi Pednekar On Fight With Taapsee Pannu During Saand Ki Aankh Said We Are Soul Sisters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.