मराठी सिनेइंडस्ट्री किंवा बॉलिवूडमधील कलाकार सोशल मीडियावर सक्रीय असून ते त्यांच्या प्रोजेक्ट व खासगी आयुष्याबद्दल शेअर करत असतात. सध्या सेलिब्रेटी त्यांच्या बालपणींचे फोटो शेअर करताना दिसत आहेत. त्यांच्या या फोटोंनादेखील चाहत्यांची पसंती मिळते. नुकताच भूमी पेडणेकर हिने तिच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. 

भूमी पेडणेकर हिने इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने लेहंगा परिधान केला आहे. या फोटोत ती खूप क्युट दिसते आहे. हा फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिलं आहे की, बालपणापासूनच नौटंकी आहे.


भूमीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती लवकरच सांड की आँख चित्रपटात झळकणार आहे. सांड की आँख चित्रपटाची कथा दोन वयस्कर महिला शार्पशूटरवर आधारीत आहे. त्याचं नाव आहे चंद्रो व प्रकाशी तोमर. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेत्री तापसी पन्नूदेखील दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्या दोघी पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.

तापसी व भूमी त्याच्या लूकमुळे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चर्चेत आल्या आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी बराच कालावधी आहे. हा चित्रपट यंदाच्या दिवाळीला म्हणजेच २५ ऑक्टोबर, २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाचं दिग्दर्शन तुषार हिरानंदानी आणि निर्मिती अनुराग कश्यप करत आहेत. तापसी व भूमीला एका वेगळ्या भूमिकेत त्यांना रुपेरी पडद्यावर पाहणे कमालीचे ठरणार आहे.

याशिवाय कार्तिक आर्यन व अनन्या पांडेच्या ‘पती, पत्नी और वो’ या रिमेकमध्येही ती झळकणार आहे.

Web Title: Bhumi Pedanekar shared childhood memories on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.