भोजपुरी चित्रपट बनवणारी नीतू चंद्रा निघाली हॉलिवूडला!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 02:17 PM2019-04-17T14:17:07+5:302019-04-17T16:32:27+5:30

भोजपुरी चित्रपटांची निर्मिती करणारी अभिनेत्री नीतू चंद्रा आता हॉलिवूडला निघालीय. होय,हॉलिवूडच्या ‘द वर्स्ट डे’ या शॉर्ट फिल्ममध्ये नीतू चंद्राची वर्णी लागली आहे.

bhojpuri cinema producer actress neetu chandra debut in hollywood movie | भोजपुरी चित्रपट बनवणारी नीतू चंद्रा निघाली हॉलिवूडला!!

भोजपुरी चित्रपट बनवणारी नीतू चंद्रा निघाली हॉलिवूडला!!

Next
ठळक मुद्देगेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमधून गायब असलेली नीतू कधीकाळी रणदीप हुड्डासोबत असलेल्या अफेअरमुळे चर्चेत आली होती.

भोजपुरी चित्रपटांची निर्मिती करणारी अभिनेत्री नीतू चंद्रा आता हॉलिवूडला निघालीय. होय,हॉलिवूडच्या ‘द वर्स्ट डे’ या शॉर्ट फिल्ममध्ये नीतू चंद्राची वर्णी लागली आहे.
हा एक कॉमेडी लघूपट आहे. बल्गेरियन दिग्दर्शक स्तानिस्लावा आयव्ही दिग्दर्शित करत असलेल्या या लघूपटात नीतू चंद्रा एका निगेटीव्ह रोलमध्ये दिसणार आहे. साहजिकच ती कमालीची उत्सुक आहे.

आपल्या या प्रोजेक्टबद्दल बोलताना तिने सांगितले की, २०१९ हे वर्ष माझ्यासाठी खूपच चांगले ठरतेय. या हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये काम करण्यास मी कमालीची उत्सुक आहे. यात मी निगेटीव्ह रोलमध्ये आहे. हॉलिवूडमध्ये  काम करण्याचा अनुभव रोमांचक होता. यातून मला खूप काही शिकायला मिळाले.
नीतू चंद्राने गरम मसाला, ट्रॅफिक सिग्नल, ओए लकी लकी ओए, वन टू थ्री, नो प्रॉब्लम अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांत काम केले आहे. याशिवाय साऊथच्या अनेक चित्रपटांतही ती झळकली आहे. नीतू चंद्राचा जन्म बिहारच्या पाटण्यात झाला. तिची मातृभाषा भोजपुरी आहे. याचमुळे तिने भोजपुरी सिनेमांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. मिथिला मखान या नीतूच्या भोजपुरी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

ती ताइक्वांडोमध्ये ब्लॅक बेल्ट आहे. १९९७ मध्ये हाँगकाँग येथे आयोजित वर्ल्ड ताइक्वांडो चॅम्पियनशिपमध्ये तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमधून गायब असलेली नीतू कधीकाळी रणदीप हुड्डासोबत असलेल्या अफेअरमुळे चर्चेत आली होती. त्यांची ही लव्हस्टोरी पडद्यावर येणार, अशीही मध्यंतरी चर्चा होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: bhojpuri cinema producer actress neetu chandra debut in hollywood movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app