ठळक मुद्देसध्या सलमान ‘नच बलिए 9’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या सेटवरचा एक व्हिडीओही सध्या व्हायरल होतो आहे.

भाईजान सलमान खानच्या चाहत्यांना केवळ दोन गोष्टींची प्रतीक्षा असते. एक म्हणजे, भाईजानचा सिनेमा आणि दुसरी म्हणजे, भाईजानचे लग्न कधी होणार, या प्रश्नाचे उत्तर. चित्रपटाचे म्हणाल तर दरवर्षी ईदच्या मुहूर्तावर भाईजान एक ब्लॉकबस्टर सिनेमा घेऊन येतो. पण भाईजानच्या लग्नासाठी मात्र चाहत्यांना बरीच प्रतीक्षा करावी लागतेय. आत्तापर्यंत अनेकींशी सलमानचे नाव जोडले गेले आहे. पण लग्नाची गोष्ट आली की, सल्लू भाई नेहमीच पळ काढत आलाय. पण आता तसे नाही. होय, सलमानच्या लग्नाचा  व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.

सलमानचा डिझाईनर एश्ले रिबेलो याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सलमान कतरीना कैफशी लग्न करताना दिसतोय आणि व-हाडी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत आहेत. सलमानचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर भाईजानने खरोखरच लग्न केले का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर नाही, तसे मुळीच नाही. सलमान व कॅटच्या लग्नाचा हा व्हिडीओ ‘भारत’ या चित्रपटाच्या सेटवरचा आहे.


पण खरे सांगायचे तर सलमानच्या चाहत्यांसाठी हा व्हिडीओ कुठल्या ट्रिटपेक्षा कमी नाही. आता फक्त ख-या आयुष्यात सल्लू भाई कधी लग्न करतो, हे पाहायचेय.
सध्या सलमान ‘नच बलिए 9’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या सेटवरचा एक व्हिडीओही सध्या व्हायरल होतो आहे. यात सलमान त्याच्या लग्नाबद्दल बोलतोय. ‘प्रत्येक जण मला मर्डर मिस्ट्री समजून ती सोडवण्याचा प्रयत्न करतो. आयुष्यात मला काय काय ऐकावे लागले नाही. माझ्या लग्नाबद्दल, सलमान रिपोर्टरवर भडकला यावर आणि माझ्या एक्सबद्दल...आता मी या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देऊनच टाकतो...,’ असे सलमान यात म्हणतोय.

Web Title: Bharat: The video of Salman Khan and Katrina Kaif getting MARRIED is going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.