‘चलो बुलावा आया है...’फेम भजन सम्राट नरेंद्र चंचल यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 04:04 PM2021-01-22T16:04:33+5:302021-01-22T16:07:25+5:30

दोन महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली.

Bhajan Samrat Narendra Chanchal Passed Away | ‘चलो बुलावा आया है...’फेम भजन सम्राट नरेंद्र चंचल यांचे निधन

‘चलो बुलावा आया है...’फेम भजन सम्राट नरेंद्र चंचल यांचे निधन

googlenewsNext
ठळक मुद्देबॉबी सिनेमानंतर नरेंद्र चंचल यांनी  बेनाम आणि रोटी कपडा और मकान या सिनेमांसाठी गाणी गायली.  

‘चलो बुलावा आया है...’ या लोकप्रिय गीताचे गायक आणि भजन सम्राट नरेंद्र चंचल यांचे आज  दीर्घआजाराने निधन झाले आहे. ते ८० वर्षांचे होते. दिल्लीच्या अपोलो रूग्णालयात आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

वृद्धापकाळामुळे आलेल्या अशक्तपणामुळे त्यांना अपोलो रूग्णालयात भरती करण्यात आले होते. दोन महिन्यांपासून या रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. गायक दलेर मेहेंदी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे नरेंद्र चंचल यांचे निधन झाल्याची माहिती दिली आहे.

त्यांच्या निधनावर कलाविश्वातील अनेक दिग्गजांनी दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नरेंद्र चंचल यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. लोकप्रिय भजन सम्राट नरेंद्र चंचल यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दु:ख झाले. या दु:खात त्यांचे कुटुंब व चाहत्यांप्रती मी संवेदना व्यक्त करतो, असे ट्विट त्यांनी केले आहे.

16  ऑक्टोबर 1940 साली अमृतसरच्या नमक हांडी येथे जन्मलेल्या नरेंद्र चंचल यांना अनेक संघर्षानंतर बॉलिवूडमध्ये काम मिळाले होते. बॉबी, बेनाम, रोटी कपडा और मकान या सिनेमांसाठीही त्यांनी गाणी गायली होती.
‘बॉबी’ चित्रपटातील ‘बेशक मंदिर मस्जिद तोडो’ हे त्यांनी गायलेले गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते. यासाठी नरेंद्र चंचल यांना फिल्मफेअर बेस्ट मेल प्लेबॅक पुरस्कार सुद्धा मिळाला होता.  पण त्यांना खरी ओळख दिली ती ‘चलो बुलावा आया है’ या ‘अवतार‘ या चित्रपटातील गाण्याने.
बॉबी सिनेमानंतर नरेंद्र चंचल यांनी  बेनाम आणि रोटी कपडा और मकान या सिनेमांसाठी गाणी गायली.  मोहम्मद रफी यांच्यासोबत 1980 मध्ये ‘तूने मुझे बुलाया शेरा वालिए’ हे त्यांनी गायलेले गाणेही लोकप्रिय झाले होते.
 नरेंद्र चंचल वैष्णोदेवीचे खूप मोठे भक्त होते. दरवर्षी न चुकता 29 डिसेंबरला ते वैष्णोदेवीला जात आणि वर्षाच्या अखेरच्या दिवशी परफॉर्मही करत.

Web Title: Bhajan Samrat Narendra Chanchal Passed Away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.