Bell Bottom Teaser: Akshay Kumar Onboard A Journey Of "Throwback To The 80s" | Bell Bottom Teaser: अक्षय कुमारच्या 'बेल बॉटम'चा अफलातून टीजर रिलीज, बघा त्याचा कडक लूक...

Bell Bottom Teaser: अक्षय कुमारच्या 'बेल बॉटम'चा अफलातून टीजर रिलीज, बघा त्याचा कडक लूक...

बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त कमाई करणारा स्टार अक्षय कुमारने नुकतंच त्याच्या आगामी आणि बहुचर्चीत 'बेल बॉटम' सिनेमाचं शूटींग पूर्ण केलं. शूटींग पूर्ण होताच या सिनेमाच टीझर रिलीज करण्यात आला आहे. टीझर पाहून सिनेमाची उत्सुकता नक्कीच वाढते. पण बेल बॉटममध्येअक्षय कुमारसोबत तीन अभिनेत्री दिसणार आहेत. मात्र, टीझरमध्ये अक्षय एकटाच धमाकेदार एन्ट्री करणाना दिसतोय. 

सहा निर्माते आणि एका दिग्दर्शकाच्या 'बेल बॉटम'च्या टीझरच्या सुरूवातीच्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत केवळ आणि केवळ अक्षय दिसतो. बेल बॉटम ही ७० दशकात वापरली जाणारी पॅंटची एक स्टाईल होती. जी अक्षय कुमारने यात वापरली आहे. 

बेल बॉटम हा सिनेमा विमान अपहरणावर आधारित असल्याचे बोलले जाते. पण टीझरमध्ये तशी काही झलक बघायला मिळाली नाही. पण विमान मात्र दिसलं. सुरूवातीला सूटा बुटात दिसणार अक्षय नंतर इंडियन एअरलाइन्सच्या विमानासमोरून कामागाराच्या ड्रेसमध्ये दिसतो. यात एकही डायलॉग दाखवला नाही. बॅकग्राऊंड म्युझिकच्या माध्यमातून अक्षयचा लूक आणि एन्ट्री प्रभावी केली..

'बेल बॉटम' सिनेमात वाणी कपूर, लारा दत्ता आणि हुमा कुरेशी अशा तीन अभिनेत्री असणार आहेत. पण टीझरमध्ये त्यांची झलक बघायला मिळाली नाही. या तिघींनीही कोरोना काळात अक्षयसोबत आधी ग्लासगो आणि नंतर लंडनमध्ये शूटींग केलं. निदान आशा करूया की, सिनेमाच्या पुढील टीझरमध्ये या तीन अभिनेत्री नक्की दिसतील.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bell Bottom Teaser: Akshay Kumar Onboard A Journey Of "Throwback To The 80s"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.