२०१० मध्ये 'झुम्माड़ी नादम' या तेलगू सिनेमातून तापसीने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. साऊथ फिल्मपासून बॉलिवूडचा प्रवास करणारी अभिनेत्री तापसी पन्नूने इंडस्ट्रीत स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले होते. अभिनेत्री बनण्यापर्यंतचा तिचा प्रवास सोपा नव्हता. संघर्षाचा काळ तिच्यासाठी खूप खडतर असल्याचे सांगताना तिने अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.

सुपरहिट हिरोसोबत काम करुनही सिनेमे बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकले नव्हते. त्यामुळे तापसीला बॅडलक हिरोइन म्हणून ओळखले जायचे. एकापाठोपाठ सिनेमा आपटल्यामुळे तिला सिनेमाच्या ऑफर्स मिळणेच बंद झाले होते. अनकेदा तर तापसीच्या जागी ऐनवेळी दुस-या अभिनेत्रींना संधी देण्यात यायची. या सगळ्या गोष्टी फार वेदनादायी असल्याचे तापसीने म्हटले होते.अगदी तुटपुंजे मानधन मला दिले जायचे. मला मानधन ठरवण्याचाही अधिकार नव्हता. 

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू  दिग्दर्शक अनुराग कश्यपआणि विकास बहल यांच्या घरावर बुधवारी रात्री उशिरापर्यंत आयकर विभागाची छापे टाकले.  आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाती  मोठे पुरावे लागल्याचं आता समोर आलं आहे. आयकर विभागाच्या माहितीनुसार दोन मोठ्या फिल्म प्रोडक्शन, अभिनेत्री तापसी पन्नू आणि दोन व्यवस्थापन कंपन्यांवर छापे टाकण्यात आले आहेत. छापेमारीत मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबाद येथील घर आणि कार्यालयांचा समावेश होता. एकूण मिळून तब्बल २८ ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती.


तापसीने ट्विटरवर शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवल्यामुळे सरकारने तिच्याविरुद्ध पाऊल उचलल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणे आहे. तापसीच्या चाहत्यांनी तिच्या समर्थनार्थ ट्वीट केले आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: At the beginning of Career, Producers Were not Casting Me Because They Thought I was Sheer Bad Luck Says Taapsee Pannu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.