bahubali actor prabhas was offered with the important role in padmaavat | भन्साळींनी ‘बाहुबली’ला दिली होती ‘पद्मावत’ची आॅफर; पण प्रभासने दिला होता नकार!!

भन्साळींनी ‘बाहुबली’ला दिली होती ‘पद्मावत’ची आॅफर; पण प्रभासने दिला होता नकार!!

‘बाहुबली’ या चित्रपटाने अभिनेता प्रभासला कधी नव्हे इतकी लोकप्रीयता मिळवून दिली. आज प्रभास भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता म्हणून ओळखला जातो. याच प्रभासला यावर्षातील एक ब्लॉकबस्टर चित्रपट आॅफर केला गेला होता. आम्ही बोलतोय ते ‘पद्मावत’ या चित्रपटाबद्दल. होय, प्रभासने ‘पद्मावत’मध्ये काम करावे, अशी संजय लीला भन्साळींची भरून इच्छा होती. भन्साळींनी ‘बाहुबली’ बघितला होता. यातील प्रभासचा अभिनय आणि त्याचा पडद्यावरचा वावर पाहून भन्साळी प्रचंड प्रभावित झाले होते. याचमुळे भन्साळींनी ‘पद्मावत’साठी प्रभासची निवड केली होती. भन्साळींनी प्रभासला राजा रतन सिंहची भूमिका आॅफर केली होती. पण प्रभासने ही भूमिका करण्यास नकार दिला. ‘बाहुबली2’च्या शूटींगमध्ये व्यस्त असल्याचे कारण पुढे करत प्रभासने भन्साळींना नम्र नकार कळवला. मात्र प्रभासने हा चित्रपट नाकारण्यामागचे कारण वेगळेच होते. ‘पद्मावत’मधील अन्य व्यक्तिरेखांच्या तुलनेत राजा रतन सिंगची भूमिका प्रभासला फार भावली नाही. ‘बाहुबली’च्या तुलनेत तर ही भूमिका फारच हलकी-फुलकी होती. अशात या चित्रपटापासून लाभ होण्यापेक्षा प्रभासच्या इमेजला नुकसानचं अधिक झाले असते. त्यामुळे प्रभासने भन्साळींची आॅफर न स्वीकारणेचं योग्य समजले. प्रभासने नकार दिल्यावर ही भूमिका शाहिद कपूरने वठवली. पुढचा सगळा इतिहास तर तुम्हाला ठाऊक आहेच.

सध्या प्रभास ‘साहो’ या चित्रपटात बिझी आहे.  यात प्रभासच्या अपोझिट दिसणार आहे ती श्रद्धा कपूर. या चित्रपटात प्रभास दमदार अ‍ॅक्शन करताना दिसणर आहे. विशेष म्हणजे या अ‍ॅक्शन सीन्ससाठी बॉडी डबल घेण्यास प्रभासने नकार दिला आहे. त्यामुळे प्रभास स्वत: सगळे स्टंट सीन्स करतोय.  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: bahubali actor prabhas was offered with the important role in padmaavat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.