ठळक मुद्देयेत्या 21 फेब्रुवारी 2020 रोजी प्रदर्शित होणा-या या चित्रपटात  नीना गुप्ता आणि गजराज राव पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत.

2012 मध्ये आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात करणा-या आयुषमान खुराणाला यशाचा मंत्र गसवला आहे. खरे तर कुठलाही अ‍ॅक्टर असा दावा करू शकत नाही. पण बॅक टू बॅक हिट चित्रपट देणारा आयुषमान मात्र हा दावा करू शकतो. एकाच भूमिकेत अडकून न पडता, सतत काही वेगळे देण्याचा आयुषमानचा प्रयत्न प्रेक्षकांनाही भावला आहे. ‘विकी डोनर’मध्ये स्पर्म डोनरची बोल्ड भूमिका साकारणारा आयुषमान आता गे पात्र साकारताना दिसणार आहे. तूर्तास त्याच्या ‘शुभमंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटाचीच काय ती चर्चा आहे. आयुषमानने या चित्रपटात घातलेली ‘नोजपिन’ही सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.


होय, ‘शुभमंगल ज्यादा सावधान’ या सिनेमात समलिंगी पुरुषाची भूमिका करताना त्यानेचक्क नोजपिन घातली आहे.

समलिंगी पुरुषांच्या हक्कांबाबत या चित्रपटात भाष्य करणा-या या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या ट्रेलरमधील आयुषमान आणि जितेंद्र कुमारचा लिप लॉक सीन, ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे’ मधील सिमरन-राजचा तो आयकॉनिक सीन या सगळ्यांसोबत आयुषमानच्या नाकातील नोजपिन सगळ्यांचे लक्ष वेधून घेतेय.

  नोजपिन घातलेली असली, तरी कुठलेही साचेबद्ध हावभाव यात त्याने केलेले दिसत नाहीत. म्हणूनच त्याच्या या नोजपिन लुकवर चाहते फिदा आहेत.
आयुषमानच्या या शर्टलेस लुकवरही चाहते फिदा झाले आहेत. 

येत्या 21 फेब्रुवारी 2020 रोजी प्रदर्शित होणा-या या चित्रपटात  नीना गुप्ता आणि गजराज राव पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. त्यांच्यासोबत सुनिता राजवार, मानवी गगारू, पंखुडी अवस्थी, नीरज सिंग, मनु ऋषी चड्ढा हेही या चित्रपटात दिसणार आहेत.

Web Title: ayushmann khurrana wears nose pin in shubh mangal zyada saavdhan trailer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.