ayushmann khurrana new film Shubh Mangal Zyada Saavdhan Trailer out | Shubh Mangal Zyada Saavdhan Trailer : ‘गे’ रोमान्स अन् ड्रामा...! पाहा,आयुषमान खुराणाचा नवा अवतार

Shubh Mangal Zyada Saavdhan Trailer : ‘गे’ रोमान्स अन् ड्रामा...! पाहा,आयुषमान खुराणाचा नवा अवतार

ठळक मुद्देयेत्या 21 फेब्रुवारी 2020 रोजी प्रदर्शित होणा-या या चित्रपटात  नीना गुप्ता आणि गजराज राव पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत.

एकापाठोपाठ सात हिट चित्रपट दिल्यानंतर बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना आता आणखी एक कॉमेडी सिनेमा घेऊन येत आहे. ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ नावाच्या या सिनेमाचा ट्रेलर काही क्षणांपूर्वी रिलीज झाला. होमोसेक्शुअ‍ॅलिटीवर आधारित असलेल्या या चित्रपटात  एका समलैगींक कपल (गे)ची  लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे.
ट्रेलरचे म्हणाल तर, यातील डायलॉग्स चांगलेच इंटरेस्टिंग आहेत. आयुषमानला ‘गे’च्या भूमिकेत पाहणेही तितकेच इंटरेस्टिंग आहे. को-स्टार जितेन्द्रसोबतचा त्याचा रोमान्सही या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो आहे. रोमान्स, ह्युमर, कॉमेडी असा हा मसालेदार ट्रेलर सध्या चांगलाच गाजतोय.


येत्या 21 फेब्रुवारी 2020 रोजी प्रदर्शित होणा-या या चित्रपटात  नीना गुप्ता आणि गजराज राव पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. त्यांच्यासोबत सुनिता राजवार, मानवी गगारू, पंखुडी अवस्थी, नीरज सिंग, मनु ऋषी चड्ढा हेही या चित्रपटात दिसणार आहेत.
आयुषमान खुराणाने एकापाठोपाठ एक सात हिट सिनेमे दिलेत. गतवर्षी रिलीज झालेले त्याचे बाला, ड्रिम गर्ल, आर्टिकल 15 हे तिन्ही सिनेमे बॉक्स आॅफिसवर गाजलेत.   ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ हा त्याचा या नव्या वर्षातील पहिला सिनेमा आहे. 2017 मध्ये आयुषमानचा ‘शुभमंगल सावधान’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. यात आयुषमान व भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले होते. आता ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ला प्रेक्षक किती स्वीकारतात ते बघूच.

Web Title: ayushmann khurrana new film Shubh Mangal Zyada Saavdhan Trailer out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.