आयुषमान बनला महागडा अभिनेता, एका जाहिरातीसाठी घेणार आता इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 04:15 PM2019-08-20T16:15:26+5:302019-08-20T16:15:39+5:30

अभिनेता आयुषमान खुराणाचे करिअर सध्या यशाच्या शिखरावर आहे. बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेता म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते.

Ayushmann khurrana hiked his fees to rupees 3.5 crore for an advertisement after winning national award reports | आयुषमान बनला महागडा अभिनेता, एका जाहिरातीसाठी घेणार आता इतके कोटी

आयुषमान बनला महागडा अभिनेता, एका जाहिरातीसाठी घेणार आता इतके कोटी

googlenewsNext

अभिनेता आयुषमान खुराणाचे करिअर सध्या यशाच्या शिखरावर आहे. बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेता म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते. अंधाधुनमधील अभिनयासाठी त्याला  सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आला. आजतकच्या रिपोर्टनुसार राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आयुषमाने त्याच्या मानधनात वाढ केली आहे. रिपोर्टनुसार आयुषमान एका जाहिरातीसाठी 3.5 कोटींची रक्कम आकारतो आहे.  


आयुषमान याच्या आधी एक जाहिरातीसाठी 90 लाख ते 1 कोटी रुपये घ्यायचा. मात्र आयुषमानच्या टीमकडून आता स्पष्ट केले आहे की जाहिरातीसाठी तो आता 3.5 कोटींची रक्कम मोजणार आहे. जाहिरातींसाठीची फीस वाढवल्यानंतर आयुषमान आता सिनेमांसाठी सुद्धा मानधन वाढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


आयुषमान खुराणाने एकामागोमाग एक हीट सिनेमा दिले आहेत. बरेली की बर्फी, अंधाधुन, बधाई हो आणि आता आर्टिकल 15 असे एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमा आयुषमानने बॉलिवूडला दिले आहेत.आर्टिकल 15 सिनेमाबाबत बोलायचे झाल तर हा सिनेमाचा आशय चांगला असेल तर सिनेमा चालतो हे आयुषमानने सिद्ध करुन दाखवलं. 


आयुषमान लवकरच 'शुभ मंगल सावधान'च्या सीक्वलमध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचे नाव 'शुभ मंगल ज्यादा सावधान' असे आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. या चित्रपटाचा सीक्वल आधीच्या भागापेक्षा खूप चांगला असणार असल्याचे बोलले जात आहे.

आधीच्या भागात आयुषमानसोबत अभिनेत्री भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत पहायला मिळाली होती. 'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपटाची कथा समलैंगिक प्रेमकथेवर आधारीत असणार आहे. या चित्रपटात आयुषमान सोबत दिव्येंदू शर्माला घेण्याबाबत बोलले जात आहे. या सिनेमात आयुषमान अभिनेत्यासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. अद्याप याबद्दल या अभिनेत्याकडून किंवा चित्रपटाच्या टीमकडून अधिकृतरित्या कोणतेही स्टेटमेंट आलेले नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन हितेश केवल्य करणार आहे.
 

Web Title: Ayushmann khurrana hiked his fees to rupees 3.5 crore for an advertisement after winning national award reports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.