Ayushmann khurrana announces upcoming film shubh mangal zyada saavdhan release date | असे विचित्र कपडे परिधान करुन कुठे पळतोय आयुषमान खुराणा, वाचा काय आहे हे प्रकरण
असे विचित्र कपडे परिधान करुन कुठे पळतोय आयुषमान खुराणा, वाचा काय आहे हे प्रकरण

ड्रीम गर्लनंतर आयुष्मान खुराणा पुन्हा एकदा नवा सिनेमा घेऊन आपल्या भेटीला येतो आहे.  आयुषमानचा 'शुभ मंगल सावधान' लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी तयार आहे. मात्र या सिनेमाची डेट बदलण्यात आली आहे. याआधी हा सिनेमा 13 मार्च 2020 रिलीज होणार होता. आता हा सिनेमा 21 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. दिग्दर्शक हितेश केवल्या यांनी या सिनेमाची शूटिंग सप्टेंबरपासूनच सुरु केली आहे. 


सिनेमाची रिलीज डेटमध्ये करण्यात आलेल्या बदलाबाबत निर्माता आनंद एल राय म्हणाले, ''हा एक कुटुंबीक सिनेमा आहे आणि लवकरात लवकर प्रेक्षकांच्या भेटीला यावा अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे.''  या सिनेमाचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरवर लिहिले आहे की, भागते-भागते आ रहे हैं हम। अब यह फिल्म 21 फरवरी 2020 को रिलीज होगी।' 

आयुषमान खुराणा आणि भूमि पेडणेकर यांच्या शुभ मंगल सावधान सिनेमाच्या यशानंतर मेकर्स पुन्हा एकदा या सिनेमाचा रिमेक बनवण्याचा तयारी सुरु झाली. शुभ मंगल सावधानच्या रिमेकमधून समलैंगिकतेवर भाष्य करण्यात येणार आहे. 2016 मध्ये आलेल्या शुभ मंगल सावधानचा हा रिमेक आहे. रिमेकमध्ये आयुषमानशिवाय नीना गुप्ता, गजराज राव आणि जितेंद्र कुमार यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

Web Title: Ayushmann khurrana announces upcoming film shubh mangal zyada saavdhan release date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.