बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीचं नाव बऱ्याच कालावधीपासून क्रिकेटर के एल राहुलसोबत जोडलं जात आहे. वारंवार येणाऱ्या डेटिंगच्या वृत्तानंतरही त्या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दलचा खुलासा केला नाही. भलेही अथिया व केएल राहुलने आपल्या नात्याबद्दल चुप्पी साधली असली तरी त्या दोघांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमुळे ते दोघं रिलेशनशीपमध्ये असल्याचा पुरावा देऊन जातो. यादरम्यान आता बॉलिवूडचे हे कपल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.


खरेतर नुकतेच केएल राहुलने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत जळलेल्या केकचा फोटो आहे ज्यात के.एल राहुलने अथिया शेट्टीलाही टॅग केले आहे. केकच्या या फोटोसोबत राहुलने लिहिलं की, अपेक्षा आणि वास्तविकतामध्ये इतकेच अंतर असते. के एल राहुलच्या रिएक्शनवरून हे स्पष्ट होते की हा जळलेला केक अथिया शेट्टीने त्याच्यासाठी बनवला आहे.

के एल राहुलचा हा फोटो अथिया शेट्टीनेदेखील शेअर केला आहे. ही गोष्ट वेगळी आहे की कुकिंग करताना हा केक थोडासा जळला आहे. यावरून असं बोललं जातंय की अथिया केएल राहुलसाठी कुकिंगचे धडे गिरवित आहे. तेव्हाच तर केक बनवताना अथियाने तो जाळला.


असेदेखील वृत्त समोर येत आहे की, सुनील शेट्टीने अथिया व केएल राहुलच्या नात्याला परवानगी दिली आहे. वडिलांकडून होकार मिळाला म्हणूनच अथिया जेवण बनवायला शिकते आहे.

नुकतेच अथिया व केएल राहुलच्या नात्याबद्दल सुनील शेट्टीने सांगितले होते की, अथिया तिच्याबाबतीतील सगळ्या गोष्टी मला सांगते. याबद्दलही आमचं बोलणं झालं आहे. मला त्या दोघांच्या नात्यासोबत मला काहीच प्रॉब्लेम नाही. त्या दोघांचे नाते खूप चांगले आहे.
सुनील शेट्टीच्या म्हणण्यानुसार समजतंय की त्याला अथिया व केएल राहुल यांच्या रिलेशनशीपला परवानगी आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Athiya Shetty baked a slightly burnt cake for cricketar KL Rahul Tjl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.