Aspiring Bengali actress Subarna Jash, 23, commits suicide | अवघ्या 23 वर्षी अभिनेत्रीने मृत्यूला कवटाळले, राहत्या घरी केली आत्महत्या

अवघ्या 23 वर्षी अभिनेत्रीने मृत्यूला कवटाळले, राहत्या घरी केली आत्महत्या

ठळक मुद्देतिने काही बंगाली मालिकांमध्ये काम केले होते.  मयुरपंख  ही तिची शेवटची मालिका होती.

वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी एका बंगाली अभिनेत्रीने आत्महत्या करत जीवनयात्रा संपवली. या अभिनेत्रीचे नाव सुबर्णा जॅश आहे. रविवारी 9 फेब्रुवारीला राहत्या घरात तिचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.  
 सुबर्णाच्या आई-वडिलांना तिचा मृतदेह घरातील फॅनला लटकलेल्या अवस्थेत दिसला. लगेचच तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत म्हणून घोषित केले. सुबर्णा गेल्या काही दिवसांपासून तणावात होती. नैराश्यातूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे कळतेय.


 

सुबणार्चा जन्म पश्चिम बंगालमधील बर्धमान जिल्ह्यात झाला. त्यानंतर ती शिक्षणासाठी कोलकात्याला आली. शिक्षण सुरू असतानाच अभिनेत्री होण्याच्या महत्त्वाकांक्षेने तिला पछाडले होते.  त्यामुळे तिने कोलकात्यामध्येच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. या काळात तिने ऑडिशन्सला जाण्यास सुरुवात केली आणि तिला सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम मिळण्यास सुरुवात झाली. अनेक वर्षे स्ट्रगल केल्यानंतरही  तिला कोणतीही मोठी भूमिका मिळू शकली नाही.

 टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, यातूनच ती तिला नैराश्य आले. गेले काही दिवस ती नैराश्यात होती. तिने काही बंगाली मालिकांमध्ये काम केले होते.  मयुरपंख  ही तिची शेवटची मालिका होती.
अलीकडे हिंदी मालिकांमधील अभिनेत्री सेजल शर्माने मुंबईतल्या मिरारोड येथील तिच्या भाड्याच्या घरात आत्महत्या केली होती. तिने सुद्धा नैराश्यातून हा टोकाचा निर्णय घेतला होता.

Web Title: Aspiring Bengali actress Subarna Jash, 23, commits suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.