ठळक मुद्देया टीजरमध्ये अन्नू कपूर राजा भद्रप्रताप सिंहच्या भूमिकेत आहेत. तर मिलिंद बोरीसच्या भूमिकेत आहे.

एकता कपूर निर्मिती असलेली आणि नुकतीच रिलीज झालेली ‘पौरषपुर’ ही वेबसीरिज सध्या जाम चर्चेत आहे. कारण काय तर अन्नू कपूर, मिलिंद सोमण यांचा कधी नव्हे असा यातील हटके अवतार. 16 व्या शतकातील एका राज्याची ही कथा यात. यात अन्नू कपूर यांनी वासनांध राजा भद्रप्रताप सिंहची भूमिका साकारली आहे. या सीरिजमध्ये अभिनेत्री अश्मिता बख्शी हिने राणी उमंगलताची भूमिका साकारली आहे. अश्मिताने अन्नू कपूरसोबत बोल्ड इंटिमेट सीन्स दिले आहेत. एका लव्ह मेकिंग सीनमध्ये अश्मिताच्या पाठीवर वितळते मेण टाकले जाते. विशेष म्हणजे, हे वितळणारे मेण अगदी रिअल होते.


 एका मुलाखतीत अश्मिताने या सीनबद्दल सांगितले. ती म्हणाली, हा सीन खूप कठीण होता. यात माझ्या पाठीवर वितळते मेण टाकले जाते. ते मेण खरोखरच खरे आणि गरम होते. मी अंगात काहीही घातले नव्हते. केवळ सिलिकॉनच्या शीटने कव्हर होती. त्यामुळे वितळणाºया मेणाने मला फार त्रास झाला नाही.

अन्नू कपूर यांच्यासोबत लव्हमेकिंग सीन्स देण्याचा अनुभव कसा होता? हेही तिने सांगितले. राजा व राणीच्या पहिल्या रात्रीचा हा लव्ह मेकिंग सीन होता. मी नर्व्हस होते. मात्र अन्नू कपूर सरांनी मी अनकम्फर्टेबल होऊ नये, याची पूरेपूर काळजी घेतली.
या बोल्ड लव्ह मेकिंग सीन्सवर कुटुंबाची प्रतिक्रिया कशी होती, हेही तिने सांगितले. ती म्हणाली, ट्रेलर पाहून माझे मॉम डॅड खूश झाले. माझ्या बोल्ड सीन्सवर ते कसे रिअ‍ॅक्ट करतील, याची मला भीती होती. पण त्यांनी माझ्या अभिनयाचे कौतुक केले. नव्या नव्या भूमिकांसाठी अशीच तयार राहा, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

या वेबसीरिजमध्ये अन्नू कपूर राजा भद्रप्रताप सिंहच्या भूमिकेत आहेत. तर मिलिंद बोरीसच्या भूमिकेत आहे. शिल्पा शिंदे आणि शहीर शेख यांच्याही यात मुख्य भूमिका आहेत. सत्तेची लढाई, वासना, रक्ताने माखलेल्या तलवारी, युद्ध,कपट, राजकारण अशी पार्श्वभूमी असलेल्या या वेबसीरिजमध्ये अन्नू कपूर यांनी एका वासनांध राजाची भूमिका साकारली आहे. त्याच्या राज्यात महिलांना केवळ भोगाची वस्तू मानले जाते. पुरूषाच्या कुठल्याही मागणीला नकार देण्याचा अधिकार नाही. यात मिलिंदने बोरिस नावाच्या ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली आहे.

Paurashpur Teaser : मिलिंद सोमण व अन्नू कपूर यांचा हा अवतार कधीही पाहिला नसेल!

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ashmita bakshi talk about intimate scene of paurashpur with annu kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.