Paurashpur Teaser : मिलिंद सोमण व अन्नू कपूर यांचा हा अवतार कधीही पाहिला नसेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2020 05:30 PM2020-12-06T17:30:00+5:302020-12-06T17:30:02+5:30

मिलिंद सोमण, शिल्पा शिंदे स्टारर पौरषपुर वेबसिरीजचा टीझर आऊट

milind soman and annu kapoor were overwhelmed after the release of paurashpur tease | Paurashpur Teaser : मिलिंद सोमण व अन्नू कपूर यांचा हा अवतार कधीही पाहिला नसेल!

Paurashpur Teaser : मिलिंद सोमण व अन्नू कपूर यांचा हा अवतार कधीही पाहिला नसेल!

Next
ठळक मुद्देसचिंद्र वत्स यांनी ही वेबसिरीज दिग्दर्शित केली असून AltBalaji आणि Zee5 वर 29 डिसेंबरपासून पौरषपुर ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मिलिंद सोमण नुकताच गोव्याच्या किना-यावरच्या ‘न्यूड रन’मुळे चर्चेत आला होता. याच मिलिंदची आता पुन्हा जोरदार चर्चा सुरु आहे. कारण काय तर त्याचा नवा अवतार. होय, त्याचा नवा अवतार पाहून प्रत्येकजण थक्क आहे. नाकात नोज रिंग, कपाळावर कुंकू असा त्याचा अवतार आहे. त्याच्यासोबत अभिनेते अन्नू कपूर यांचीही जोरदार चर्चा आहे. मिलिंद व अन्नू कपूर यांची ‘पौरषपूर’ नावाची वेबसीरिज येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे आणि या वेबसीरिजचा टीजर सध्या जबरदस्त ट्रेंडमध्ये आहे.

या टीजरमध्ये अन्नू कपूर राजा भद्रप्रताप सिंहच्या भूमिकेत आहेत. तर मिलिंद बोरीसच्या भूमिकेत आहे. शिल्पा शिंदे आणि शहीर शेख यांच्याही यात मुख्य भूमिका आहेत. सत्तेची लढाई, वासना, रक्ताने माखलेल्या तलवारी, युद्ध,कपट, राजकारण अशी पार्श्वभूमी असलेल्या या वेबसीरिजमध्ये अन्नू कपूर यांनी एका वासनांध राजाची भूमिका साकारली आहे. त्याच्या राज्यात महिलांना केवळ भोगाची वस्तू मानले जाते. पुरूषाच्या कुठल्याही मागणीला नकार देण्याचा अधिकार नाही. यात मिलिंदने बोरिस नावाच्या ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली आहे. येत्या 8 डिसेंबरला या वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज होणार आहे.

 तूर्तास ‘पौरषपूर’चा टीजर सोशल मीडियावर हिट झाला आहे. चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सचिंद्र वत्स यांनी ही वेबसिरीज दिग्दर्शित केली असून AltBalaji आणि Zee5 वर 29 डिसेंबरपासून पौरषपुर ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मिलिंद सोमणच्या ‘न्यूड रन’वरून अलीकडे वादंग उठले होते. मिलिंद सोमणने 4 नोव्हेंबर रोजी आपला 55 वा वाढदिवस साजरा केला.  फिटनेससाठी ओळखल्या जाणा-या मिलिंदने गोव्याच्या बीचवर धावून वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला सुरुवात केली होती. मात्र, धावताना त्याच्या अंगावर एकही कपडा नव्हता. तो पूर्ण नग्नावस्थेत धावला. मिलिंदची पत्नी अंकिता कोनवार हिने त्याची ही छबी कॅमे-यात टिपली होती. यानंतर मिलिंदने  त्याचा हा फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या न्यूड फोटोवरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्यावर खरपूस टीका झाली होती.
    

Web Title: milind soman and annu kapoor were overwhelmed after the release of paurashpur tease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app