रिया सेनसोबतच्या एमएमएसमुळे चर्चेत आला होता अश्मित पटेल, व्हायरल झाला होता एमएमएस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 11:31 AM2021-01-13T11:31:29+5:302021-01-13T12:08:45+5:30

तो व्हिडिओ एका हॉटेलच्या रूममध्ये चित्रीत करण्यात आला होता. ९० सेकंदाच्या या व्हिडिओत आक्षेपार्ह दृश्यं होती.

Ashmit patel Riya sen MMS clip making waves | रिया सेनसोबतच्या एमएमएसमुळे चर्चेत आला होता अश्मित पटेल, व्हायरल झाला होता एमएमएस

रिया सेनसोबतच्या एमएमएसमुळे चर्चेत आला होता अश्मित पटेल, व्हायरल झाला होता एमएमएस

googlenewsNext
ठळक मुद्देहा व्हिडिओ लीक झाल्यानंतर त्या दोघांना मीडियाच्यासमोर येऊन स्पष्टीकरण द्यावे लागले होते. हा व्हिडिओ स्वतः अश्मितने लीक केला होता असे म्हटले जाते. त्यावेळी रिया बॉलिवूडमध्ये फेमस होती. पण अश्मितला त्यावेळी बॉलिवूडमध्ये कोणी ओळखत नव्हते.

अश्मित पटेल बिग बॉस या कार्यक्रमात झळकला होता. अश्मितने काही चित्रपटात देखील काम केले असले तरी त्याला बॉलिवूडमध्ये काही यश मिळाले नाही. पण अश्मित त्याच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो. बिग बॉसच्या घरात असताना अभिनेत्री वीणा मलिकसोबत त्याचे सूत जुळले होते. बिग बॉसच्या घरात वीणा आणि अश्मित यांचे चाळे पाहून प्रेक्षक चांगलेच भडकले होते. अश्मितचा आज वाढदिवस असून तो अभिनेता अमिषा पटेलचा भाऊ आहे. 

अश्मित पटेलने इंतेहा या चित्रपटाद्वारे त्याच्या बॉलिवूड करियरला सुरुवात केली. चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यानंतर काहीच वर्षांत तो एका एमएमएसमुळे चर्चेत आला होता. रिया सेन आणि अश्मित सिलसिले या चित्रपटात एकत्र झळकले होते. या चित्रपटाच्यावेळी त्यांच्या अफेअरची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यांचा एक एमएमएस इंटरनेटवर लीक झाला होता. यामुळे त्या दोघांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. तो व्हिडिओ एका हॉटेलच्या रूममध्ये चित्रीत करण्यात आला होता. ९० सेकंदाच्या या व्हिडिओत आक्षेपार्ह दृश्यं होती. हा व्हिडिओ लीक झाल्यानंतर त्या दोघांना मीडियाच्यासमोर येऊन स्पष्टीकरण द्यावे लागले होते. हा व्हिडिओ स्वतः अश्मितने लीक केला होता असे म्हटले जाते. त्यावेळी रिया बॉलिवूडमध्ये फेमस होती. पण अश्मितला त्यावेळी बॉलिवूडमध्ये कोणी ओळखत नव्हते. त्यामुळे प्रसिद्धीसाठी त्याने हा व्हिडिओ लीक केला असल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. 

अश्मितचा एमएमएस लीक झाल्याचा उलट त्याला फायदाच झाला होता. कारण त्याला त्यानंतर मर्डर, नजर, फाइट क्लब यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. तसेच बिग बॉस या प्रसिद्ध कार्यक्रमाचा भाग होता आले होते. बिग बॉसच्या घरात असताना वीणासोबतच्या अफेअरमुळे तो चर्चेत आला होता. पण घराच्या बाहेर आल्यानंतर त्यांचे प्रेम काही टिकले नाही.

काही वर्षांपूर्वी महक चहलसोबत देखील अश्मित नात्यात होता. त्या दोघांनी साखरपुडादेखील केला होता. ते लग्न करतील असे सगळ्यांना वाटत असताना त्यांनी ब्रेकअप केले. 

Web Title: Ashmit patel Riya sen MMS clip making waves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.