Mumbai cruise drug case : Aryan Khan ला तुर्तास दिलासा नाहीच; जामीन अर्जावर बुधवारी होणार सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 12:33 PM2021-10-11T12:33:10+5:302021-10-11T12:33:35+5:30

Cruise drugs case: २ ऑक्टोबर रोजी एनसीबीने (NCB)एका क्रुझवर छापा टाकत ड्रग्स पार्टीचा डाव उधळून लावला. या पार्टीमध्ये अभिनेता शाहरुख खानचा लेक आर्यन खानचादेखील (aryan khan) समावेश होता.

aryan khan drugs case shahrukh khan son will seek bail on modnay before session court | Mumbai cruise drug case : Aryan Khan ला तुर्तास दिलासा नाहीच; जामीन अर्जावर बुधवारी होणार सुनावणी

Mumbai cruise drug case : Aryan Khan ला तुर्तास दिलासा नाहीच; जामीन अर्जावर बुधवारी होणार सुनावणी

googlenewsNext
ठळक मुद्देकोर्टाने जामीन अर्ज फेटाळला तर आम्ही नक्कीच उच्च न्यायालयात धाव घेऊ

cruise drugs case:  ड्रग्स पार्टी केल्याप्रकरणी (Mumbai Drug Bust Case)   अटकेत असलेल्या आर्यन खानच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आर्यनच्या जामीन अर्जावर बुधवार, १३ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस पुन्हा एकदा त्याला आणि अरबाज मर्चेंटला ऑर्थर रोड तुरुंगात रहावं लागणार आहे. बुधवारी २.४५ वाजता या दोघांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

आर्यन खानच्या वकिलाकडून मुंबईच्या किला कोर्टात जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र, तो शुक्रवारी कोर्टाने फेटाळला. यामुळे आर्यनला शुक्रवारची रात्र इतर कैद्यासोबतच आर्थर रोड जेलमध्ये काढावी लागली. आर्यनचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सतीश मान-शिंदे यांनी पुन्हा जामिनासाठी पुन्हा नवीन याचिका दाखल केली. मात्र, आता या जामीन अर्जावर १३ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार असल्याचं न्यायलयाने स्पष्ट केलं आहे. हा खटला आता विशेष एनडीपीएस कोर्टात होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच एनसीबीनेदेखील उत्तर देण्यासाठी काही काळाचा अवधी मागितला आहे.

"कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला तर आम्ही नक्कीच उच्च न्यायालयात धाव घेऊ. आम्ही मुंबईतील विशेष एनडीपीएस कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे", असं वकील सतीश मान-शिंदे म्हणाले.

दरम्यान,२ ऑक्टोबर रोजी एनसीबीने (NCB)एका क्रुझवर छापा टाकत ड्रग्स पार्टीचा डाव उधळून लावला. या पार्टीमध्ये अभिनेता शाहरुख खानचा लेक आर्यन खानचादेखील (aryan khan) समावेश होता. सध्या आर्यनला आर्थर रोड जेलमध्ये (arthur road jail) ठेवण्यात आलं आहे. त्याच्यासोबतच त्याचा मित्र अरबाज मर्चेंटदेखील तुरुंगात आहे.
 

Web Title: aryan khan drugs case shahrukh khan son will seek bail on modnay before session court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.