ठळक मुद्देअरविंद स्वामी थलायवी या चित्रपटात अभिनेते-राजकारणी एमजीआर म्हणजेच एमजी रामचंद्रन यांच्या भूमिकेत दिसणार आहे. 

‘रोजा’ आणि ‘बॉम्बे’ या दोन्ही चित्रपटात आपल्याला एक हँडसम हिरो पाहायला मिळाला होता. त्या काळात त्या हिरोची चांगलीच चर्चा होती. या अभिनेत्याच्या अभिनयासोबतच त्याच्या दिसण्यावर त्याचे चाहते फिदा होत असत... या दोन्ही चित्रपटाद्वारे आपली एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेता अरविंद स्वामीला नव्वदीच्या दशकात चांगलेच फॅन फॉलोव्हिंग मिळाले होते. त्याचा आता एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटातील त्याचा पहिला लूक प्रेक्षकांसमोर आणण्यात आला आहे.

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या बायोपिकमध्येअभिनेत्री कंगना राणौत मुख्य भूमिका साकारणार आहे. ‘थलायवी’ नामक या बायोपिकमध्ये अरविंद स्वामी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटामधील त्याचा लूक नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या लूकमध्ये अरविंद स्वामीला ओळखणे देखील कठीण जात आहे. अरविंद स्वामीने कित्येक किलो वजन कमी केले असून तो या लूकमध्ये खूपच वेगळा दिसत आहे.

अरविंद स्वामी १५ वर्षं तरी चित्रपटसृष्टीपासून दूर होता. पण डिअर डॅड या चित्रपटाद्वारे त्याने 2016 मध्ये अभिनयक्षेत्रात कमबॅक केला. आता तो थलायवी या चित्रपटात अभिनेते-राजकारणी एमजीआर म्हणजेच एमजी रामचंद्रन यांच्या भूमिकेत दिसणार आहे. 

अरविंद स्वामीला अभिनयात नव्हे तर बिझनेसमध्ये रस असल्याने त्याने अभिनयक्षेत्राला 2000 मध्ये रामराम ठोकला. तो त्याच्या व्यवसायात व्यग्र असताना 2005 मध्ये त्याचा एक भीषण अपघात झाला आणि या अपघातात त्याच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली. त्यात त्याला अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुळे तो अनेक वर्षं व्हिलचेअरवर होता. चार ते पाच वर्षं उपचार घेतल्यानंतर तो बरा झाला. पण या दरम्यान त्याचे वजन अनेक किलो वाढले होते. त्याने चित्रपटसृष्टीत कमबॅक करण्यासाठी जवळजवळ 15 किलो वजन कमी केले. 

Web Title: arvind swami is unrecognizable in Thalaivi movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.