नवोदित लेखक-दिग्दर्शक दिव्यांग ठक्करच्या सिनेमाकरिता रणवीर सिंग आणि यश राज फिल्म्स एकत्र आले आहेत. या चित्रपटाचं नाव आहे 'जयेशभाई जोरदार'. या सिनेमातील रणवीरचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात रणवीरसोबत कोणती अभिनेत्री मुख्य भूमिका साकारणार हे गुलदस्त्यात होते. मात्र, आता या अभिनेत्रीचं नाव समोर आलं आहे.

'अर्जुन रेड्डी' या प्रसिद्ध तेलगू चित्रपटातील अभिनेत्री शालिनी पांडे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 

शालिनी पांडे हिने हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मी रणवीरसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. रणवीर हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. त्यामुळे त्याच्यासोबत काम करण्यासाठी मी अतिशय उत्सुक आहे.


'जयेशभाई जोरदार' या चित्रपटासाठी शालिनीने ऑडिशनही दिली आहे. सध्या शालिनीचं वय २५ वर्ष आहे. शालिनीने आपल्या करिअरची सुरूवात तेलगू सिनेसृष्टीतून केली आहे. या चित्रपटात रणवीर एका गुजराती तरूणाची भूमिका साकारणार आहे.

विशेष म्हणजे या भूमिकेसाठी रणवीरने आपलं वजन कमी केलं आहे. त्यामुळे जयेशभाई जोरदार चित्रपटात रणवीरला पाहणं कमालीचं ठरणार आहे. 
शालिनीने दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा याच्या 'अर्जून रेड्डी' चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती.


या चित्रपटात तिने साकारलेली प्रितीची भूमिका प्रेक्षकांना खूपच भावली होती. तेलगू शिवाय तमीळ चित्रपटातही शालिनीने काम केलं आहे.

Web Title: Arjun Reddy's girlfriend means Shalini Pandey will now be seen with this Bollywood actor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.