ठळक मुद्दे गॅब्रिएलाएक आफ्रिकी मॉडेल आहे. ‘सोनाली केबल’ या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता.

अर्जुन रामपालने काही दिवसांपूर्वी त्याची गर्लफ्रेन्ड गॅब्रिएला ही प्रेग्नंट असल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. आत्तापर्यंत गॅब्रिएलाबद्दल बोलायला अर्जुन कचरायचा. पण आताश: दोघेही खुल्लम खुल्ला फिरताना दिसतात. काल अर्जुनने गॅब्रिएला सरप्राईज देत, बेबी शॉवर पार्टी होस्ट केली. या बेबी शॉवरचे फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

गॅब्रिएलाची बेबी शॉवर पार्टी अर्जुनची एक्स-वाईफ मेहर जेसिया होस्ट करणार, अशी काही दिवसांपूर्वी चर्चा होती. पण ही पार्टी अर्जुनने होस्ट केली.

पाहुण्यांचे आतिथ्य करण्यापासून तर पार्टीत डीजे बनण्यापर्यंतच्या अनेक भूमिका तो यावेळी पार पाडताना दिसला. या पार्टीत अर्जुन व गॅब्रिएलाचे मित्र हजर होते. अर्जुन व गॅब्रिएला यांचे लग्न झालेले नाही. लग्नाआधीच गॅब्रिएला प्रेंग्नट राहिली. तूर्तास अर्जुन व गॅब्रिएला पाली हिलच्या एका अपार्टमेंटमध्ये लिव्ह-इनमध्ये राहत आहेत.

अर्जुनला पहिल्या पत्नीपासून दोन मुली आहेत. त्यांची नावं माहिका आणि मायरा आहेत. मेहर जेसिका आणि अर्जुनने एकमेकांसोबत 20 वर्ष संसार केला. पत्नी मेहर जेसिकासोबत घटस्फोट झाल्यानंतर अर्जुन गॅब्रिएलात त गुंतला. हळूहळू दोघेही एकमेकांच्या जवळ आलेत. यानंतर अनेक इव्हेंटला दोघेही एकत्र दिसू लागलेत.   

गेल्या काही महिन्यांपासून अर्जुन त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएलासोबत बिनधास्तपणे मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसत होता. गॅब्रिएलाएक आफ्रिकी मॉडेल आहे. ‘सोनाली केबल’ या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. पण बॉक्सआॅफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही.  
 


Web Title: arjun rampal turns dj on girlfriend gabriella demetriadess baby shower
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.