arjun rampal tests positive for coronavirus and says i have isolated myself | अर्जुन रामपालही कोरोना पॉझिटीव्ह, एकाच दिवशी पाच बॉलिवूड स्टार्सला झाली लागण

अर्जुन रामपालही कोरोना पॉझिटीव्ह, एकाच दिवशी पाच बॉलिवूड स्टार्सला झाली लागण

ठळक मुद्देकतरिना कैफ गेल्या 6 एप्रिलला कोरोना पॉझिटीव्ह आढळली होती. आता तिचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे.

बॉलिवूड इंडस्ट्रीत कोरोनाने कहर केल्याचे पाहायला मिळत आहे. आता अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) हाही कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे. काल शनिवारी बॉलिवूडचे पाच बॉलिवूड स्टार्स कोरोनाचे शिकार ठरलेत. (Corona Outbreak in bollywood) 
अर्जुन रामपालने ट्विटरवरून कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली.

‘माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. माझ्यात कोणतीही लक्षणे नाहीत. मी स्वत:ला क्वारंटाइन केले आहे आणि आरोग्याची काळजी घेत, सर्व नियमांचे काटेकोर पालन करतोय. काही काळ तरी स्वत:ची काळजी घ्या, यामुळे फायदाच होईल. आपल्याला एकत्र येऊन कोरोनाशी लढा द्यावा लागेल,’ असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 
अर्जुन रामपालआधी काल शनिवारी अभिनेता नील नितीन मुकेश, सोनू सूद, सुमीत व्यास व मनीष मल्होत्रा हे सगळे कोरोना पॉझिटीव्ह आढळून आलेत. (Bollywood Celebrities Corona Positive)
गेल्या काही दिवसांत बॉलिवूडच्या अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. अक्षय कुमार, गोविंदा, विकी कौशल, आमिर खान, कतरिना कैफ, भूमी पेडणेकर, आलिया भट, रणबीर कपूर, कार्तिक आर्यन, आशुतोष राणा, सतीश कौशिक, परेश रावल अशा सगळ्यांचा यात समावेश आहे.

कतरिना कैफ निगेटीव्ह

कतरिना कैफ गेल्या 6 एप्रिलला कोरोना पॉझिटीव्ह आढळली होती. आता तिचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. कतरिनाने सोशल मीडियावर चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. निगेटीव्ह...ज्या सर्वांनी माझी काळजी घेतली, त्या सर्वांचे आभार, असे तिने लिहिले आहे. कतरिनाचा बॉयफ्रेन्ड विकी कौशल याचा रिपोर्टही एक दिवसांआधीच निगेटीव्ह आला होता. शुक्रवारी आपल्या इन्स्टा अकाऊंटवर फोटो शेअर करत रिपोर्ट निगेटीव्ह आल्याची माहिती त्याने दिली होती.
कतरिनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच ती फोन भूत, सूर्यवंशी, टायगर 3 या सिनेमात झळकणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: arjun rampal tests positive for coronavirus and says i have isolated myself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.