अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेन्डने केले HOT फोटोशूट, काहीच महिन्यांपूर्वी दिला बाळाला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 11:20 AM2019-11-17T11:20:52+5:302019-11-17T11:21:02+5:30

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेन्ड गॅब्रिएला डेमिट्रिएड्स सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहेत. गत 18 जुलैला गॅब्रिएलाने एका गोंडस मुलाला जन्म दिला.

arjun rampal girlfriend Gabriella Demetriades latest hot photo | अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेन्डने केले HOT फोटोशूट, काहीच महिन्यांपूर्वी दिला बाळाला जन्म

अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेन्डने केले HOT फोटोशूट, काहीच महिन्यांपूर्वी दिला बाळाला जन्म

googlenewsNext
ठळक मुद्दे गॅब्रिएलाला 2017 मध्ये FHM मासिकाकडून जगातल्या पहिल्या 100 सेक्सी महिलांमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. 

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेन्ड गॅब्रिएला डेमिट्रिएड्स सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहेत. गत 18 जुलैला गॅब्रिएलाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आणि अर्जुन तिस-यांदा बाबा झाला. बाळाच्या जन्मानंतर उण्यापु-या दहाच दिवसांत गॅब्रिएला तिच्या जुन्या शेपमध्ये परतली होती.  वर्कआऊटनंतरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोत ती एकदम फिट दिसली होती.  हा फोटो पाहिल्यानंतर तिने खरंच काही दिवसांपूर्वी बाळाला जन्म दिला आहे, यावर अनेकांचा विश्वास बसेना. तूर्तास गॅब्रिएलाने अनेक ग्लॅमरस फोटो तिच्या सोशल अकाऊंटवर शेअर केले आहेत.

 


गॅब्रिएलाने  काही महिन्यांपूर्वी मुलाला जन्म दिला, यावर हे फोटो पाहिल्यानंतर विश्वास बसणार नाही. बाळंतपणानंतर गॅब्रिएला आणखीच हॉट दिसत असून तिचे लेटेस्ट फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

गॅब्रिएला 2009 मध्ये आयपीएल दरम्यान पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये दिसली होती. त्यानंतर अचानक अर्जुन रामपालसोबत तिच्या अफेअर बातम्या चर्चेत आल्या. यानंतर दोघेही लग्न करणार, असे मानले जात असतानाच ग्रॅब्रिएलाने अर्जुनच्या मुलाला जन्म दिला. म्हणजे लग्नाआधीच ग्रॅब्रिएला आई झाली.

गॅब्रिएला आणि अर्जुन 2018 पासून एकमेकांना डेट करत आहेत. गॅब्रिएला सध्या भारतातच वास्तव्यास असून हे दोघंही लवकरच लग्न करतील असे बोलले जात आहे.

मुलाच्या जन्मानंतर अवघ्या काही आठवड्यात गॅब्रिएलाने वजन घटवले असून ती आता पूवीर्पेक्षा अधिक हॉट दिसत असल्याचे तिच्या चाहत्यांचे मत आहे. 

बाळाच्या जन्मानंतरही गॅब्रिएला सोशल मीडियावर सक्रिय आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 356000 फॉलोअर्स आहेत. ती नेहमीच तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. 


गॅब्रिएलाला 2017 मध्ये FHM मासिकाकडून जगातल्या पहिल्या 100 सेक्सी महिलांमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. 

Web Title: arjun rampal girlfriend Gabriella Demetriades latest hot photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.