आरारारारारा खतरनाक! मलायकासोबत अर्जुनची फिल्मी स्टाईल डेट नाईट, Decoration पाहून उडाली असणार तिची झोप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 11:07 AM2021-12-07T11:07:45+5:302021-12-07T11:12:44+5:30

Arjun Kapoor Malaika Arora Maldives Vacation :अर्जुन व मलायकाच्या मालदीवमधील रोमॅन्टिक व्हॅकेशनचे फोटो, व्हिडीओ तर तुम्ही पाहिले असतीलच. आता अर्जुनने या व्हॅकेशनचा आणखी एक रोमॅन्टिक व्हिडीओ शेअर केला आहे

Arjun Kapoor Shares A The Romantic Date Night With Girlfriend Malaika Arora During Their Maldives Vacay | आरारारारारा खतरनाक! मलायकासोबत अर्जुनची फिल्मी स्टाईल डेट नाईट, Decoration पाहून उडाली असणार तिची झोप

आरारारारारा खतरनाक! मलायकासोबत अर्जुनची फिल्मी स्टाईल डेट नाईट, Decoration पाहून उडाली असणार तिची झोप

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor ) व मलायका अरोरा (Malaika Arora ) यांची लव्ह लाईफ आताश: कुणापासूनही लपून राहिलेली नाही. हे लव्हबर्ड्स अगदी खुल्लमखुल्ला फिरताना दिसतात. सोशल मीडियावरही अगदी खुल्लमखुल्ला प्रेम व्यक्त करतात. कालच हे जोडपं मालदीवमधून परतलं. मालदीवमधील दोघांच्या रोमॅन्टिक व्हॅकेशनचे फोटो, व्हिडीओ तर तुम्ही पाहिले असतीलच. आता अर्जुनने या व्हॅकेशनचा आणखी एक रोमॅन्टिक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मलायका व अजुर्नची फिल्मी स्टाईल डिनर डेटची झलक पाहायला मिळतेय.

दूरवर पसरलेला समुद्र आणि या समुद्राकाठी वाळूवर चितारलेली हार्टशेप आकृती. याभोवती मेणबत्ती व दिव्यांचा मंद प्रकाश आणि मध्ये लव्हबर्ड्सच्या डिनरसाठी सजलेला टेबल. पिवळ्या रंगाच्या गाऊनमध्ये मलायका याठिकाणी येते आणि हे सगळं सरप्राईज पाहून खूश्श होते. अर्जुनने हा रोमॅन्टिक व्हिडीओ इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडीओच्या बॅकग्राऊंडमध्ये हार्डी संधूचं गाणं ऐकायला येतेय.  

अर्जुनने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडतोय. मलायका व अजुनने एकमेकांसोबत किती सुंदर वेळ घालवला, हेच या व्हिडीओतून दिसतंय.
काही दिवसांपूर्वी मलायका व अर्जुन कपूर यांच्या ब्रेकअपची चर्चा होती. मात्र दोघांनीही मालदीव व्हॅकेशनचे फोटो शेअर करत, या सगळ्या अफवा असल्याचे स्पष्ट केलं आहे.

वर्कफ्रॅन्टबाबत सांगायचं तर अर्जुन कपूर ‘भूत पोलीस’ सिनेमात दिसला होता. सिनेमात त्याने सैफ अली खान, यामी गौतम, जॅकलिन फर्नांडिससोबत काम केलं होतं. ही हॉरर-कॉमेडी काही लोकांना आवडली होती. आता अर्जुन ‘एक व्हिलन 2’मध्ये बिझी आहे. या सिनेमात तो जॉन अब्राहम, तारा सुतारिया आणि दिशा पटनीसोबत काम करताना दिसणार आहे. तर मलायका इंडियाज बेस्ट डान्सरची जज आहे.

Web Title: Arjun Kapoor Shares A The Romantic Date Night With Girlfriend Malaika Arora During Their Maldives Vacay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.