ठळक मुद्दे1996 साली रिलीज झालेल्या ‘दरार’ या चित्रपटातून अरबाजने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली.

सलमान खानला सगळेच ओळखतात. पण सलमानचा भाऊ अरबाज खान हाही कमी नाही. सलमान इतका लोकप्रिय नसला तरी अरबाजने बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अभिनेताच नाही तर निर्माता अशीही त्याची ओळख आहे. आज (4 ऑगस्ट) याच अरबाजचा  वाढदिवस. 

1996 साली रिलीज झालेल्या ‘दरार’ या चित्रपटातून अरबाजने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात अरबाज निगेटीव्ह रोलमध्ये होता. या भूमिकेसाठी त्याला बेस्ट निगेटीव्ह रोलसाठी फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.अनेक चित्रपटात तो लीड हिरो म्हणून दिसला. यानंतर काही चित्रपटात सहाय्यक अभिनेता म्हणून तो झळकला.  

अरबाजचे ‘ अरबाज खान प्रॉडक्शन’ नावाने स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस देखील आहे.  २०१० साली प्रदर्शित झालेला ‘दबंग’ हा त्याच्या प्रॉडक्शन हाऊसचा पहिला सिनेमा होता.

पाच वर्ष डेट केल्यानंतर अरबाजने अभिनेत्री मलायका अरोरासोबत लग्न केले. १९९३ दोघंही एकमेकांना एका जाहिरातीच्या शूटिंग दरम्यान भेटले होते.  १२ डिसेंबर ११९८ साली दोघांनी ख्रिश्चन आणि मुस्लिम पद्धतीने लग्न केले.  दोघांनाही अरहान नावाचा एक मुलगा आहे.  अरबाज आणि मलायका यांनी २०१७ साली घटस्फोट घेतला. 

मलायका अरोराशी घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज खान आपल्या लव्ह लाईफला घेऊन चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून अरबाज त्याच्या जियोर्जिया एंड्रियानीसोबतच्या रिलेशनशीपला घेऊन चर्चेत आहे.  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: arbaaz khan birthday childhood pics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.