anurag kashyap shared post with taapsee pannu after the income tax department raid | आमच्या हेटर्सला खूप साऱ्या शुभेच्छा...! आयकर कारवाईनंतर अनुराग कश्यपचे पहिले ट्विट

आमच्या हेटर्सला खूप साऱ्या शुभेच्छा...! आयकर कारवाईनंतर अनुराग कश्यपचे पहिले ट्विट

ठळक मुद्देधाडसत्रानंतर अनुराग व तापसी पुन्हा शूटींगवर परतले आहेत.

आयकर विभागाने गेल्या 3 मार्चला अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यासह त्यांच्या संबंधितांच्या मालमत्तेवर धाडी टाकल्या. मुंबई आणि पुण्यातल्या 30 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. या धाडसत्रानंतर तापसीने ट्विट करत, टीकाकारांना सणसणीत उत्तर दिले होते. आता अनुराग कश्यप यानेही हेटर्सला आपल्या खास शैलीत सुनावले आहे.
अनुरागने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत त्याच्यासोबत तापसी पन्नूही दिसत आहे. ‘... आणि आम्ही #DoBaaraa सुरुवात करतोय. आमच्या हेटर्सला आमच्याकडून खूप सा-या शुभेच्छा, ’ असे उपरोधिक ट्विट अनुरागने केले. ट्विटमधील तापसी व अनुरागचा फोटो ‘दोबारा’ या चित्रपटाच्या सेटवरचा आहे. धाडसत्रानंतर अनुराग व तापसी पुन्हा शूटींगवर परतले आहेत.

धाडसत्रानंतर काल तापसीने पहिल्यांना आपले मौन सोडत तीन ट्विट केले होते. तिने लिहिले होते,


तीन दिवसांत तीन गोष्टींची सखोल झडती
1. पॅरिसमधील माझ्या मालकीचा असलेला ‘कथित’ बंगला कारण की, उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत. 
2. मी याआधीच नाकारलेल्या 5 कोटी रकमेची ‘कथित’ पावती. 
3. सन्माननीय अर्थमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2013 मध्ये माझ्या घरी धाड पडली होती. लक्षात ठेवा, आता मी इतकी स्वस्त राहिली नाहिये...
  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: anurag kashyap shared post with taapsee pannu after the income tax department raid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.