anurag kashyap on manmarziyaan controversy to those whose hurt is genuine i offer a genuine apology | ‘मनमर्जियां’च्या रिलीजनंतर अनुराग कश्यप यांनी मागितली माफी! वाचा, संपूर्ण बातमी!!

‘मनमर्जियां’च्या रिलीजनंतर अनुराग कश्यप यांनी मागितली माफी! वाचा, संपूर्ण बातमी!!

बॉलिवूडचा ‘मनमर्जियां’ हा चित्रपट गत १४ सप्टेंबरला रिलीज झाला आणि रिलीजसोबतचं चित्रपटासंदर्भातील एक वाद चर्चेत आला. यानंतर या चित्रपटाविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली गेली . पण आता या वादाला नवे वळण मिळाले आहे. होय,‘मनमर्जियां’चे दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी या संपूर्ण वादाबद्दल माफी मागितली आहे. या चित्रपटातील अभिषेक बच्चन व तापसी पन्नूच्या स्मोकिंग सीनवर शिख समुदायाने आपली नाराजी व्यक्त केली होती. या दृश्यावर आक्षेप घेत शिख समुदायाने अनेक ठिकाणी निदर्शने केली होती. हा वाद वाढत असल्याचे दिसताच या संपूर्ण प्रकरणावर अनुराग कश्यप यांनी माफी मागणेचं योग्य समजले. ‘मनमर्जियां’ बनवताना कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. मी यावेळी भारतात नाही. पण मीडियावर आलेल्या बातम्या वाचून माझ्या चित्रपटामुळे शिख समुदायाच्या भावना दुखावल्याचे मला कळले. मी सगळ्यांना सांगू इच्छितो की, माझा चित्रपट कुठल्याही समुदायाबद्दल विचार मांडत नाही. माझा चित्रपट केवळ आणि केवळ व्यक्ति आणि त्यांच्या आवडीवर भाष्य करणारा आहे. आम्ही चित्रपट बनवण्याआधी शिख समुदायातील अनेक व्यक्तिंशी चर्चा केली होती. आम्ही चित्रपटात लग्नाचे दृश्य चित्रीत करत असताना, आम्ही गुरूद्वारात खोटे लग्न शूट करू शकत नाही, असे आम्हाला सांगण्यात आले. त्यामुळेच आम्ही केवळ गुरूद्वारात माथे टेकवतांनाचा सीन दाखवला. आम्ही स्मोकिंग सीन शूट केला, पण तो सीन रस्त्यावर शूट करण्यात आला. त्यावेळी तिथे शेकडो लोक हजर होते. आम्ही तेव्हाही त्यांच्या सल्ला घेतला होता. स्मोक करण्यापूर्वी पगडी उतरवावी, असे या लोकांनी आम्हाला सांगितले. लोकांच्या सल्ल्यानुसार आम्ही तो सीन शूट केला. चित्रपटातील एकही सीन सल्लामसलत न करता शूट केलेला नाही. पण तरिही आमच्या चित्रपटामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी व्यक्तिश: त्यासाठी माफी मागतो, असे अनुराग कश्यपने म्हटले आहे.
आता अनुराग कश्पयच्या या माफीनाम्यानंतर हा वाद कुठल्या वळणाला जातो, ते बघूच.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: anurag kashyap on manmarziyaan controversy to those whose hurt is genuine i offer a genuine apology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.