अंकिता लोखंडेचे वडील हॉस्टिपलमध्ये दाखल, फोटो शेअर करत म्हणाली....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 11:55 AM2020-09-18T11:55:57+5:302020-09-18T12:10:00+5:30

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर अंकिता पूर्णपणे कोडलमडून गेली.

Ankita lokhande wishes her father for a speedy recovery shares photo from the hospital | अंकिता लोखंडेचे वडील हॉस्टिपलमध्ये दाखल, फोटो शेअर करत म्हणाली....

अंकिता लोखंडेचे वडील हॉस्टिपलमध्ये दाखल, फोटो शेअर करत म्हणाली....

googlenewsNext

अभिनेत्री अंकिता लोखंडेने आपल्या आयुष्यात अनेक चढ-उतार बघितले आहेत. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर अंकिता पूर्णपणे कोडलमडून गेली. याच दरम्यान अंकिताचे वडील शशिकांत लोखंडे यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. अंकिताने स्वत: ही माहिती सोशल मीडियावर दिली. अंकिताने तिच्या इन्स्टास्टोरीवर वडिलांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात शशिकांत लोखंडे हॉस्पिटलच्या बेडवर बसलेले दिसतायेत. 


सुशांतला न्याय देण्यासाठी अंकिता लोखंडे सोशल मीडियावर मोहिम सुरु केली होती. अलीकडेच सुशांतच्या मृत्यूला तीन महिने पूर्ण झाल्यानंतर अंकिताने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली होती. अंकिताने ट्विटरवर लिहिले होते की, 'वेळ किती लवकर निघून जातो. जगणं आपल्या वेगाने सुरू राहतं, पण आपल्या प्रिय लोकांच्या काही आठवणी कधीही विसरता येत नाहीत. सुशांत तू नेहमी आमच्या आठवणीत आणि विचारांमध्ये राहिशील' #Justice4SSRIsGlobalDemand #itsalready3monthstoday '

अंकिता सुशांतच्या फार जवळ होती. 'पवित्र रिश्ता' मालिकेदरम्यान सुशांत आणि अंकिता एकमेकांच्या प्रेमात पडले होते. आणि पुढे ६ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. पण नंतर त्यांचं ब्रेकअप झालं. तरी अंकिताने स्वत:ला कधीही सुशांतच्या परिवारापासून वेगळं केलं नाही. या स्थितीतही अंकिता सुशांतच्या परिवारासोबत उभी आहे. सतत न्यायाची मागणी करत आहे. अंकिता सुशांतचं अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी समोर आली आहे. सुशांतचं स्वप्न होतं की, तो १ हजार झाडे लावणार. हेच त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अंकिताने तिच्या घरापासून सुरूवात केली आहे. सोबतच त्याचे फॅन्सही यात सहभागी होणार आहेत.
 

अंकिता लोखंडेला बरं-वाईट बोलली; हेटर्सनी शिबानी दांडेकरची 'ओळखच बदलली'!

 

Web Title: Ankita lokhande wishes her father for a speedy recovery shares photo from the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.