Ankita Lokhande reharsal video for arward show where she will pay tribute to Sushnt Singh Rajput | VIDEO: अंकिता लोखंडेने सुशांतच्या आठवणीत केला डान्स, म्हणाली - माझ्याकडून तुझ्यासाठी...

VIDEO: अंकिता लोखंडेने सुशांतच्या आठवणीत केला डान्स, म्हणाली - माझ्याकडून तुझ्यासाठी...

अंकिता लोखंडे ही एक चांगली अभिनेत्री असण्यासोबतच एक चांगली डान्सरही आहे. हे वेळोवेळी तिने सिद्ध केलं आहे. नुकताच तिने तिचा एक डान्स प्रॅक्टिसचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.  हा व्हिडीओ खास यासाठी आहे कारण या डान्सच्या माध्यमातून अंकिताने सुशांत सिंह राजपूतला ट्रिब्यूट देणार आहे.

अंकिता लोखंडेने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात ती 'तारों के शहर में' गाण्यावर डान्स रिहर्सल करताना दिसत आहे. तिने या व्हिडीओच्या कॅप्शनला लिहिले आहे की, 'यावेळी हे वेगळं आहे आणि परफॉर्म करणं अवघड. माझ्याकडून तुझ्यासाठी. हे वेदनादायी आहे.

अंकिता एका अवॉर्ड शोमध्ये परफॉर्म करणार आहे. ती या डान्सच्या माध्यमातून दिवंगत अभिनेता आणि तिचा पूर्वाश्रमीचा बॉयफ्रेन्ड सुशांत सिंह राजपूत याला ट्रिब्युट देणार आहे. अंकिताचा हा व्हिडीओ पाहून दोघांचे फॅन्सही इमोशनल झाले आहेत. त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये लिहिले की, हे बघणं फार अवघड होईल.

दरम्यान, अंकिता आणि सुशांत सिंह राजपूतची भेट 'पवित्र रिश्ता'च्या सेटवर झाली होती. इथेच दोघेही प्रेमात पडले होते. दोघेही नंतर ६ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते आणि लग्नाचं प्लॅनिंग करत होते. २०१६ मध्ये काही कारणाने दोघांचं ब्रेकअप झालं. आता अंकिता लोखंडे विकी जैनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
 

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ankita Lokhande reharsal video for arward show where she will pay tribute to Sushnt Singh Rajput

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.