‘या’ गंभीर आजाराच्या उपचारासाठी जर्मनीत गेलेला अनिल कपूर, 11 वर्षांपासून भोगतोय वेदना!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 01:50 PM2021-11-28T13:50:47+5:302021-11-28T13:51:20+5:30

मी आपल्या शेवटच्या उपचारासाठी डॉ. मूलर यांना भेटायला जातोय. त्यांचे आणि त्यांच्या टीमचे आभार,’ असं लिहित Anil Kapoorने जर्मनीतला एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ पाहताच, चाहते चिंतेत पडले होते.

anil kapoor went to germany for achilles tendinitis treatment | ‘या’ गंभीर आजाराच्या उपचारासाठी जर्मनीत गेलेला अनिल कपूर, 11 वर्षांपासून भोगतोय वेदना!!

‘या’ गंभीर आजाराच्या उपचारासाठी जर्मनीत गेलेला अनिल कपूर, 11 वर्षांपासून भोगतोय वेदना!!

Next

आपल्या फिटनेससाठी ओळखला जाणारा अभिनेता अनिल कपूरने (Anil Kapoor) जर्मनीतला व्हिडीओ शेअर केला  आणि चाहत्यांना धडकी भरली. होय, ‘बर्फावर एक परफेक्ट वॉक, जर्मनीतला शेवटचा दिवस. मी आपल्या शेवटच्या उपचारासाठी डॉ. मूलर यांना भेटायला जातोय. त्यांचे आणि त्यांच्या टीमचे आभार,’ असं लिहित अनिल कपूरने जर्मनीतल्या रस्त्यावर चालतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ पाहताच, चाहते चिंतेत पडले होते. आपल्या पोस्टमध्ये अनिल कपूरने आजाराबद्दल काहीही माहिती दिली नसल्यामुळे चाहत्यांची चिंता वाढली होती. अनिल कपूरला नेमका कोणता आजार झालाये? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. पण आता त्याचा खुलासा झाला आहे.

होय, झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, अनिल कपूर गेल्या 11 वर्षांपासून अकिलिस टेंडिनाइटिस  (Achilles tendinitis) नावाच्या आजाराचा सामना करतोय. याच आजारावर उपचार करण्यासाठी तो जर्मनीला गेला होता. 16 ऑक्टोबर 2020 रोजी अनिलने याच आजाराबद्दलची माहिती देणारी पोस्ट शेअर केली होती.
 ‘गेल्या 10 वर्षांपासून अकिलिस टेंडनच्या समस्येचा सामना करत होतो. जगभरातील डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की, ही समस्या दूर केली जाऊ शकत नाही आणि मला सर्जरी करावी लागेल. पण डॉ.मुलर यांनी माझ्यावर चांगले उपचार केले आणि मला मार्गदर्शन केलं. त्यांच्या मदतीने सर्जरी न करता मी ठीक झालो. मला आता व्यवस्थित चालता येतं. मी पुन्हा धावू लागलो आहे आणि आता स्किपिंगही आरामात करू शकतो’, असं अनिल कपूरने त्या पोस्टमध्ये लिहिलं होतं. त्या पोस्टमध्येही त्यांनी डॉ. मूलर यांचा उल्लेख केला होता.
कालपरवा केलेल्या पोस्टमध्येही त्याने याच डॉक्टरांचा उल्लेख केला आहे. यावरून याच आजाराच्या उपचारासाठी अनिल कपूर जर्मनीत होता, असं स्पष्ट होतं. 2019 मध्ये अनिल कपूर उजव्या खांद्याच्या दुखण्याने बेजार झाला होता. तेव्हाही त्याने डॉ. मूलर यांच्याकडेच उपचार घेतले होते.
या आजाराच्या रूग्णाला  चालायला त्रास होतो आणि खूप वेदना होतात. या समस्येमुळे शस्त्रक्रिया देखील करावी लागू शकते.  अकिलिस टेंडन मेदयुक्त बनलेली एक पट्टी आहे, जी स्नायूंना हाडांशी जोडते. हे पायच्या खालच्या बाजूला मागे असते. जी पिंढरीच्या मांसपेशींना टाचांच्या हाडांशी जोडते. अकिलिस टेंडन ही समस्या प्रामुख्याने धावपटूंमध्ये सामान्य आहे. वृद्ध लोक आणि गतीमान हालचाली करणा-या लोकांमध्ये सुद्धा उद्भवू शकते. 

Web Title: anil kapoor went to germany for achilles tendinitis treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app