anil kapoor talks about salman khan and aamir khan | अनिल कपूर म्हणे, आमिर व सलमान खान ‘ढोंगी’; पण का?
अनिल कपूर म्हणे, आमिर व सलमान खान ‘ढोंगी’; पण का?

बॉलिवूडचा सदाबहार अभिनेता अनिल कपूरने अलीकडे गोव्यात आयोजित इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आॅफ इंडियात हजेरी लावली. यादरम्यान अनिल कपूर जे काही बोलला, त्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. अनिलने बॉलिवूडच्या दोन सुपरस्टार्सबद्दल मोठा खुलासा केला. हे दोन सुपरस्टार्स कोण तर आमिर खानसलमान खान. होय, आमिर व सलमान दोघेही ‘ढोंगी’ आहेत, असे अनिल यावेळी म्हणाला. 
 इंडस्ट्रीतले कलाकार सुरुवातीला यश मिळवात. गाडी, बंगला खरेदी केल्यावर मात्र ते आळशी बनतात, त्यांचे काम तितक्या गांभीर्याने घेत नाहीत. या कॅटेगरीत तू बॉलिवूडच्या कोणत्या कलाकारांना ठेवशील? असा प्रश्न अनिलला करण्यात आला होता.

यावर उत्तर देताना अनिलने लगेच प्रश्नकर्त्याशी सहमती दर्शवली. मी तुमच्या या म्हणण्याशी सहमत आहे. अनेक अभिनेते आधी चांगले काम करतात पण नंतर आळशी होतात. आता आमिरचेच घ्या. तो स्वत:ला आळशी म्हणवून घेतो. पण प्रत्यक्षात असे अजिबात नाही. तो केवळ आळशी असल्याचा केवळ दिखावा करतो. आता आमिरच आळशी आहे तर आपणही व्हायला काय हरकत आहे, असे त्याच्यामुळे अनेक कलाकारांना वाटते. पण प्रत्यक्षात आमिर अजिबात आळशी नाही.

सलमानचेही असेच. मी जेव्हाकेव्हा सलमानसोबत प्रवास करतो, तेव्हा बघतो की, सलमान स्वत:साठी अगदी चमचमीत जेवण मागवतो. खरे सांगायचे तर सलमान असे जेवण अगदी क्वचित जेवतो. त्याचे बघून मी सुद्धा चमचमीत जेवणावर ताव मारावा, असा त्याचा हेतू असतो. सलमान खान जेवणावर असा मस्त ताव मारतो तर मी का नाही? असे अनेकांना त्याच्याकडे बघून वाटते. आमिर व सलमान दोघेही अन्य कलाकारांना भ्रमित करतात, असे अनिल म्हणाला. अर्थात गमतीत, हे सांगायला नकोच.


 

Web Title: anil kapoor talks about salman khan and aamir khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.