ठळक मुद्देअनिल कपूरने त्याचे सुपरहिट गीत ‘माय नेम इज लखन’वर नृत्य सादर केले आणि त्याची ती हटके स्टेप देखील सादर केली. या वयातही अनिलची एनर्जी वाखाणण्याजोगी होती.

सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनच्या इंडियन आयडल या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन हिट गेले आहेत. या कार्यक्रमाचा यंदाचा सिझन प्रेक्षकांना प्रचंड आवडला असून या कार्यक्रमातील सगळ्याच स्पर्धकांचे आवाज प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. नेहा कक्कड, विशाल दादलानी आणि हिमेश रेशमिया या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत असून या कार्यक्रमाचा विजेता कोण ठरणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.


 
इंडियन आयडलच्या आगामी भागात मलंग चित्रपटाचे कलाकार अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर, दिशा पटानी आणि कुणाल खेमू हजेरी लावणार आहेत. हे कलाकार आपल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसणार आहेत. इंडियन आयडलमधील सगळ्याच स्पर्धकांच्या गाण्याने ते भारावून जाणार आहेत.


 
इंडियन आयडलच्या सर्व स्पर्धकांनी अनिल कपूरची सुपरहिट गाणी गात या सदाबहार अभिनेत्याला मानवंदना दिली. त्यांच्या सुमधुर आवाजाने अनिल कपूर आपल्या जागी बसून राहूच शकला नाही आणि मंचावर जाऊन त्याने स्पर्धकांसोबत आपले सुपरहिट गीत ‘माय नेम इज लखन’वर नृत्य सादर केले आणि त्याची ती हटके स्टेप देखील सादर केली. या वयातही अनिलची एनर्जी वाखाणण्याजोगी होती. त्याच्यासोबत सूत्रसंचालक आदित्य नारायणने देखील ताल धरला.
 


इंडियन आयडलची स्पर्धक अंकोना हिच्या आईने सांगितले की, ती अनिल कपूरची खूप मोठी चाहती आहे आणि त्याच्यासोबत नृत्य करण्याची तिची इच्छा आहे, तेव्हा हा ‘झकास’ कपूर लगेच त्यासाठी तयार झाला आणि मंचावर जाऊन त्याने तिच्यासोबत नृत्य सादर केले.


 

Web Title: Anil Kapoor shows his Jakhas Dance moves on Indian Idol season 11

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.