Anil Kapoor Just Shared Pic From His Upcoming Film Malang and Everyone Wants to Age Like Him | वाचा... अनिल कपूरला फॅन्स का विचारतायेत, सर खरे सांगा, तुम्ही किती वर्षांचे आहात?

वाचा... अनिल कपूरला फॅन्स का विचारतायेत, सर खरे सांगा, तुम्ही किती वर्षांचे आहात?

ठळक मुद्देअनिलने हा फोटो शेअर केल्यानंतर त्याचे चाहते या फोटोवर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. अनिल अजूनही तितकाच तरुण कसा दिसतो? हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडलेला आहे.

अनिल कपूरने बेटा, लम्हे, जमाई राजा, 1942 : अ लव्ह स्टोरी, जुदाई, हम आपके दिल मे रहते है, रेस यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. त्याने केवळ भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवर देखील त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनिल कपूर हा बॉलिवूडमधील चॉकलेट हिरो मानला जातो. अनिलने वयाची साठी पार केली असली तरी तो आजही एखाद्या तरुण मुलासारखाच दिसतो. आजच्या तरुण अभिनेत्यांना लाजवेल अशी त्याच्यात एनर्जी आहे. त्यामुळे अनिल कपूरचे नेहमीच कौतुक केले जाते. त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा त्याने नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून केली.  

अनिल कपूर आता दिशा पटानी, आदित्य रॉय कपूर, कुणाल खेमू यांच्यासोबत मलंग या चित्रपटात काम करणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सुरी करणार आहे. या चित्रपटाविषयी काल घोषणा अनिलने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून केली. त्याने या चित्रपटाच्या टीमसोबत एक फोटो शेअर करून आम्ही मलंगमध्ये एकत्र काम करत आहोत असे लिहिले आहे. अनिलने हा फोटो शेअर केल्यानंतर एक वेगळीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.


अनिल कपूर या सगळ्या कलाकारांपेक्षा वयाने खूपच मोठा आहे. पण तरीही अनिल या सगळ्यांपेक्षा तरुण दिसत असल्याचे नेटिझन्सचे म्हणणे आहे.


अनिलने हा फोटो शेअर केल्यानंतर त्याचे चाहते या फोटोवर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. अनिल अजूनही तितकाच तरुण कसा दिसतो? हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडलेला आहे. अनिलचे वय ६२, आदित्य रॉय कपूरचे ३३, दिशा पटानीचे २६ तर कुणाल खेमूचे ३५ वर्षं आहे. त्यामुळे हा फोटो पाहाता अनिलसाठी वय म्हणजे केवळ एक आकडा आहे असे त्याच्या एका चाहत्याचे म्हणणे आहे.


एवढेच नव्हे तर अनिलचे खरंच वय ६२ आहे की २६ असा प्रश्न त्याचे फॅन्स त्याला विचारत आहेत.  

अनिल कपूरचे तारुण्य पाहाता अनिल तैमुरसोबत देखील तो काही वर्षांनी मुख्य भूमिकेत झळकेल असे नेटिझन्सचे म्हणणे आहे.


अनिल कपूरच्या चाहत्यांनी त्याच्या फोटोवर दिलेल्या कमेंटची सगळीकडेच चर्चा रंगली आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Anil Kapoor Just Shared Pic From His Upcoming Film Malang and Everyone Wants to Age Like Him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.