1 मे आधी तुला लस मिळालीच कशी? अनिल कपूरची चाहत्यांनी अशी घेतली मजा, पोरानेही घेतली फिरकी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 12:45 PM2021-04-23T12:45:48+5:302021-04-23T12:48:02+5:30

अनिल कपूरचे वय आहे 64 वर्ष. पण त्याला पाहून त्यांनी वयाची साठी ओलांडलीये, यावर कुणाचाही विश्वास बसत नाही...

Anil Kapoor gets 2nd jab of COVID vaccine, son Harsh Varrdhan and fans quirky comment | 1 मे आधी तुला लस मिळालीच कशी? अनिल कपूरची चाहत्यांनी अशी घेतली मजा, पोरानेही घेतली फिरकी

1 मे आधी तुला लस मिळालीच कशी? अनिल कपूरची चाहत्यांनी अशी घेतली मजा, पोरानेही घेतली फिरकी

googlenewsNext
ठळक मुद्देतुम्हाला माहित आहेच की, सध्या 45 वयाच्या वरच्या व्यक्तिंना कोरोना लस दिली जात आहे. 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे.

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरने (Anil Kapoor) कोरोना लसीचा दुसरा डोज घेतला. लस घेतानाचा एक फोटो त्याने शेअर केला आणि हा फोटो शेअर करताच चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या.  (actor Anil Kapoor  took his second jab of the COVID-19 vaccine) अनिल कपूरचे वय आहे 64 वर्ष. पण त्याला पाहून त्यांनी वयाची साठी ओलांडलीये, यावर कुणाचाही विश्वास बसत नाही. कोरोना लसीचा दुसरा डोज घेतानांचा त्याचा फोटो पाहून चाहत्यांनी नेमक्या याच प्रतिक्रिया दिल्यात. (Anil Kapoor’s son Harsh VarrdhanKapoor expresses doubt over his father’s eligibility for COVID-19 vaccine)
तुम्हाला माहित आहेच की, सध्या 45 वयाच्या वरच्या व्यक्तिंना कोरोना लस दिली जात आहे. 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे.

पहिली प्रतिक्रिया मुलाची...

अनिलने लस टोचतानाचा  फोटो शेअर करताच अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन याने कमेंट केली. तुम्ही दुसरा डोज कसा घेतला? मुळात 45 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तिला लस मिळालीच कशी? अशी मजेदार कमेंट त्याने केली. यानंतर राकेश ओमप्रकाश मेहरा यांनीही अनिलची अशीच फिरकी घेतली. ‘तू तर 18 वर्षांपेक्षाही कमी वयाचा आहेस,’ असे त्यांनी लिहिले.

फॅन्सनेही घेतली मजा...

18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांना 1 मे पासून लस मिळणार आहे, मग तुम्हाला लस कशी मिळाली? अशा आशयाच्या शेकडो कमेंट करत अनिल कपूरची मजा घेतली. तुम्ही तरूण होण्याची लस तर घेतली नाही ना? असा मजेदार प्रश्न एका चाहत्याने विचारला. अरे तुम्ही 45 प्लस आहात? विश्वास बसत नाही, असे एका चाहत्याने लिहिले.

अनिल कपूरने दिले उत्तर


चाहत्यांच्या या मजदार कमेंट्सवर अनिल कपूरने तितकेच मजेदार उत्तर दिले. खरं आहे, लस देणा-यांनी माझ्या आधार कार्डवरची जन्मतारीख बघितली नसती तर मला नक्कीच 1 मे नंतर यायला सांगितले असते, असे त्याने लिहिले.
 

Web Title: Anil Kapoor gets 2nd jab of COVID vaccine, son Harsh Varrdhan and fans quirky comment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.